Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला, नंदूरबारच्या सुपुत्राला झारखंडमध्ये वीरमरण

Nandurbar Latest News : महाराष्ट्र राज्याने आणखी एक विरपुत्र गमावला. नंदूरबारच्या सुपुत्र शहीद रमेश वसावे यांना झारखंडमध्ये वीरमरण आलं. मेजर रमेश वसावे यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी

नंदूरबार : महाराष्ट्राने आणखी एक विरपुत्र गमावला आहे. नंदुरबारच्या सुपुत्रला झारखंडमध्ये वीरमरण आलं आहे. देशसेवा बजावणाऱ्या नंदूरबार जिल्ह्याचे सुपुत्र शहीद रमेश वसावे यांना वीरमरण आलं आहे. झारखंड येथे कर्तव्य बजावताना रमेश वसावे यांना वीरमरण आलं आहे. शहीद रमेश वसावे यांच्यावर आज शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदूरबारचे शहीद मेजर रमेश वसावे हे सीआरपीएफ दलात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची जम्मू येथून राजस्थानच्या अजमेरमध्ये बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा अजमीरहून झारखंडला बदली करण्यात आली.

रमेश वसावे हे सोमवारी रात्री नियुक्तीच्या ठिकाणी हजर होते. त्यावेळी त्यांना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव अजमेर होऊन रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घोटाळीपाडा या मूळ गावी आणण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी त्यांना मानवंदना देऊन शासकीय इंतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

शहीद मेजर रमेश वसावे त्यांच्या पहिली ते दहावी शिक्षण शहादा तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये झालं. 2005 साली त्यांची सीआरपीएफ मध्ये निवड झाली होती.

रमेश वसावे हे कुटुंबात मोठे असल्याने घरात वयोवृद्ध आई शेवंताबाई, लहान दोन भावंडे तीन बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती. रमेश वसावे यांना दोन मुले आहेत. रमेश वसावे यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत. रमेश वसावे यांच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT