Manasvi Choudhary
गणेशोत्सवात बाप्पाचा प्रसाद खाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच उत्सुक असतात. विशेषतः लहान मुलांना पारंपरिक उकडीच्या मोदकांपेक्षा थोडे युनिक आणि गोड असलेले चॉकलेट मोदकआणि मावा मोदक जास्त आवडतात.
यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि मुलांच्या आनंदासाठी हे दोन्ही खमंग मोदक घरच्या घरी कसे बनवायचे?
लहान मुलांना चॉकलेटचे मोदक खायला जास्त आवडतात. तुम्ही घरच्या घरी हे मोदक सोप्या पद्धतीने बनवू शकता. मोदक बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चॉकलेट मोदक बनवण्यासाठी पार्ले-जी किंवा ओरिओ बिस्किटे,दूध , ड्रायफ्रुट्स, साजूक तूप हे साहित्य घ्या.
१) मोदक बनवण्यासाठी सर्वातआधी बिस्किटांचे बारीक तुकडे करा. ते तुकडे मिक्करमध्ये वाटून त्याची बारीक पावडर करा.
२) एका बाऊलमध्ये ही पावडर काढून त्यात साजूक तूप आणि थोडे-थोडे दूध घालून मऊ गोळा मळून घ्या.
३) मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावून घ्या आणि तयार पिठाचा गोळा साच्यामध्ये दाबून भरा.
४) मध्यभागी आवडीनुसार थोडे ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेट सिरप भरा. त्यानंतर घरच्या घरी चॉकलेटचा मोदक तयार होईल.
मावा मोदक लहान मुलांना आवडतात. तुम्ही घरच्या घरी दुधाच्या खव्यापासून हे मोदक बनवू शकता. मोदक बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मावा मोदक बनवण्यासाठी खवा/मावा, पिठीसाखर किंवा दूध, वेलची पावडर, केसर आणि ड्रायफ्रुट्स हे साहित्य घ्या.
१) गॅसवर पॅनमध्ये खवा हलकासा परतून घ्या.
२) खवा थोडा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि केसर मिक्स करा.
३) मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावून त्यात माव्याचे मिश्रण भरा.
४) त्यानंतर घरच्या घरी मावा मोदक तयार होईल.