Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss 20 - 2nd Week Nomination : 'बिग बॉस २०'च्या घरात दुसऱ्या आठवड्यात तीन सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 'वीकेंड का वार' सलमान खानने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली.
Bigg Boss 20 - 2nd Week Nomination
Bigg Boss 20SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस २०'च्या घरात दुसऱ्या आठवड्याचे नॉमिनेश पार पडले.

घरातील ३ सदस्य नॉमिनेट झाले.

घरात आम्रपाली दुबे आणि माही विजमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

'बिग बॉस २०'चा पहिला 'वीकेंड का वार' नुकताच पार पडला आहे. सलमान खानने घरातील काही सदस्यांचे कौतुक केले तर काहींना फटकारले. घरात पहिल्या दिवसापासून भांडणे पाहायला मिळत आहेत. पहिल्या आठवड्यात लव गिल, अरिशफा खान, उदिती सिंह आणि कनिका मान हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यात 'वीकेंड का वार' मध्ये उदिती सिंहला कमी मते मिळाले असल्याचे समजले. मात्र एक्सट्रा जीवनदानचा वापर करून उदिती सुरक्षित झाली.

आता 'वीकेंड का वार'मध्येच दुसऱ्या आठवड्यासाठी तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंग यांचा समावेश आहे. हे तिघे टास्क दरम्यान नॉमिनेशनवर चर्चा करत होते, त्यामुळे बिग बॉसने संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द करून त्यांना थेट शिक्षा दिली. कॅप्टन यंग डीएसए देखील या चर्चेत सहभागी होता, पण कॅप्टन असल्यामुळे त्याला वगळण्यात आले.

येणारा 'वीकेंड का वार' खूपच मनोरंजक असणार आहे. 'बिग बॉस २०'चे पहिले एलिमिनेशन या आठवड्यात होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

आसिफ-उदिती यांच्यात भांडण

'बिग बॉस २०'च्या घरात आसिफ खान आणि उदिती सिंह यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आहे. आसिफने गंमतीत उदितीला टाळी दिली. त्यानंतर उदितीने मोठा गदारोळ केला. उदितीने असिफला सांगितले की, तिला हे असभ्य वाटले. त्याने हे मुद्दाम केले. तिला कोणीही विनाकारण स्पर्श केलेला आवडत नाही. त्यानंतर असिफने माफी मागितली. पण त्याने तिला जाणूनबुजून स्पर्श केल्याचे उदितीने सांगितले. या वक्तव्याने आसिफला मनस्ताप झाला. संतापलेल्या आसिफने उदितीबद्दल वाईटही बोलले. यानंतर त्यांच्यात वादावादी पाहायला मिळाली.

Bigg Boss 20 - 2nd Week Nomination
Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com