Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Aadhaar Verification : आधारधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. UIDAI ने Aadhaar Face Authentication SDK आणि Sandbox लॉन्च केले आहेत. यामुळे अधिकृत संस्था मोबाइल अॅपमध्येच फेस वेरिफिकेशन जोडू शकतील.
Aadhaar Card Update
Aadhaar Card Update meta ai
Published On

Aadhaar Card Update: आधार कार्ड हा आता सर्वात महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आधार अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. पण याची प्रोसेस खूप मोठी आणि किचकट असते. मात्र डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. त्याने घरबसल्या सर्वच गोष्टी सोप्या होतात.आता डिजिटस सेवा आणखी सोयीस्कर करण्यासाठी UIDAI ने मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAIने Aadhaar Face Authentication SDK आणि Aadhaar Face Authentication Sandbox लॉन्च केला आहे. हे दोन्ही टूल्स ९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत झालेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये सादर करण्यात आले.

या नव्या SDK मुळे बँका, फिनटेक कंपन्या, सरकारी विभाग आणि इतर अधिकृत संस्था त्यांच्या Android आणि iOS मोबाइल अॅपमध्येच Aadhaar Face Authentication सुविधा जोडू शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेरिफिकेशनसाठी वेगळ्या अॅपमध्ये जाण्याची किंवा अॅप्समध्ये सतत स्विच करण्याची गरज कमी होणार आहे. यामुळे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रोसेस जास्त सोपी आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

Aadhaar Card Update
DA Hike : DA 60% वरून थेट 64%? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ

SDK मध्ये कोणत्या सुविधा?

UIDAIच्या या SDKमध्ये AI/ML आधारित liveness detection आणि anti-spoofing तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याशिवाय ऑथेंटिकेशन डेटा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी एन्क्रिप्शनला सपोर्ट देण्यात आला आहे. हे SDK ग्राहकांच्या स्मार्टफोनवर वापरता यावं, यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

Aadhaar Card Update
EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Sandbox का महत्त्वाचा?

SDKसोबत UIDAIने Aadhaar Face Authentication Sandbox सुद्धा सुरू केला आहे. हा विकासक आणि गुणवत्ता तपासणी करणाऱ्या टीमसाठी सुरक्षित टेस्टिंग वातावरण असेल. उत्पादनात सुविधा सुरू करण्यापूर्वी face capture, consent, liveness check, authentication, error handling आणि response validation यांसारख्या प्रक्रियांची चाचणी करता येईल.

महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या biometric hardware शिवाय नेटवर्क समस्या, timeout, चुकीचे digital signature आणि spoofing attempts यांसारख्या failure scenariosचीही चाचणी करता येणार आहे.

UIDAIच्या मते, Aadhaar Face Authentication तंत्रज्ञानाचा वापर Digital Life Certificate, Ayushman Bharat onboarding, DBT, Aadhaar-enabled payments, SIM activation आणि विविध सरकारी योजनांमध्ये होत आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या प्रणालीने आतापर्यंत ५०० कोटीहून जास्त व्यवहार प्रक्रिया केले असून जवळपास २०० संस्थांनी ती स्वीकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com