EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

PF Account : EPFO ने WhatsApp सेवा सुरू केली आहे. ‘Hello’ पाठवून PF बॅलन्स, मागील पाच व्यवहार आणि क्लेम स्टेटस तपासा. UANशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरून पडताळणी आवश्यक आहे.
EPFO WhatsApp
EPFO WhatsAppmeta ai
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी WhatsApp वरून वेगवेगळ्या सेवा आणि अपडेट्स मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे. EPFO ने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत या नव्या सुविधेची माहिती दिली आहे. त्यामुळे आता PF खात्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी सदस्यांना प्रत्येक वेळी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

EPFO च्या अधिकृत WhatsApp चॅनेलशी जोडून सदस्यांना खातं आणि सेवांशी संबंधित अपडेट्स मिळवता येणार आहेत. यासाठी EPFO ने आपल्या पोस्टमध्ये QR कोडसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. QR कोड स्कॅन करून किंवा अधिकृत WhatsApp चॅनेलच्या लिंकच्या मदतीने सदस्य या सुविधेशी जोडले जाऊ शकतात.

EPFO WhatsApp
Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

WhatsApp वर EPFO ची सेवा वापरण्यासाठी सदस्याने अधिकृत चॅनेलवर ‘Hello’ टाइप करायचे आहे. यानंतर EPFO कडून युजर्सच्या पडताळणी केली जाईल. संदेश UAN म्हणजेच Universal Account Number शी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून आला आहे की नाही, हे तपासले जाईल.

पडताळणी यशस्वी झाल्यानंतर सदस्याला स्थानिक भाषेत सोपे मेन्यू पर्याय उपलब्ध होतील. त्यामधून आवश्यक सेवा निवडून माहिती मिळवता येईल. काही प्रश्नांची उत्तरे थेट चॅटबॉटच्या माध्यमातून मिळतील, तर गरजेनुसार EPFO डेटाबेसमधून माहिती शोधून दिली जाऊ शकते.

EPFO WhatsApp
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ₹2,000 मिळवायचे असतील तर आताच करा ही 3 कामे; अन्यथा अडकू शकतो हप्ता

कोणती माहिती मिळणार?

तुम्हाला WhatsApp च्या सुविधेद्वारे सदस्यांना PF खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळू शकते. तसेच मागच्या पाच व्यवहारांची माहिती आणि EPFO अंतर्गत केलेल्या क्लेमची स्थिती तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे. EPFO च्या या नव्या WhatsApp सेवेमुळे सदस्यांना PF संबंधित माहिती अधिक सोप्या आणि जलद पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com