

PM Kisan Yojana: शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांना शेतीकामात कोणतीही कमी पडू नये म्हणून विविध प्रकारच्या योजना राबवून त्यांना आर्थिक मदत करतं. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.
पीएम किसानचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. यावेळी सुमारे ९.४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,८८० कोटी रुपये DBTद्वारे पाठवण्यात आले. आता शेतकरी २४व्या हप्त्याची वाट पाहतायेत. मात्र या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. काही अहवालांमध्ये ऑक्टोबर २०२६ च्या आसपास हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत सोशल मिडिया किंवा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये.
पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी e-KYC महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची e-KYC अपूर्ण असेल तर ती लवकर पूर्ण करा. OTP व्यतिरिक्त बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता DBTद्वारे जमा होतो. त्यामुळे बँक खातं आधारशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. नाव, आधार क्रमांक किंवा बँक खात्याच्या तपशीलात चूक असेल तर हप्ता अडकू शकतो.
शेतकऱ्याच्या जमिनीचा रेकॉर्ड पीएम किसानच्या नोंदीशी सीड झालेला असणं गरजेचं आहे. जमीन मालकीची माहिती चुकीची किंवा अपूर्ण असेल तर लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
नवरा-बायको दोघांनाही स्वतंत्र्यपणे पीएम किसानचा लाभ घेता येत नाही. तसेच कुटुंबातल्या कोणी आयकर भरत असल्यास, संवैधानिक पदावर असल्यास किंवा दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन शेती करत असल्यास योजनेचा लाभ मिळत नाही. योजनेत जमिनीची मालकी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे २४वा हप्ता मिळण्याची वाट पाहण्याआधी e-KYC, आधार- बँक लिंक आणि जमीन रेकॉर्ड या तीन गोष्टी तपासणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.