

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष महागाई भत्त्याकडे लागलं आहे. त्याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता म्हणजेच DA ५८ टक्क्यांवरून ६० टक्के केला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. याचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होत आहे.
केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनीही आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DA आणि DR मध्ये वाढ केली आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये DA २ टक्क्यांनी वाढून ६० टक्के झाला आहे. बिहारमध्ये वेगवेगळ्या पे-कमिशननुसार DA वाढवण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार DA ५८ वरून ६० टक्के, तर सहाव्या वेतन आयोगानुसार २५७ वरून २६२ टक्के करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने ५वा, ६वा आणि ७वा केंद्रीय वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या कालावधीतील DA एरियरसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच निवृत्त अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या DR मध्येही २ टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.
ओडिशा, सिक्कीम आणि तामिळनाडूमध्येही DA मध्ये २ टक्के वाढ करण्यात आली असून तो ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्तर प्रदेशातही DA ५८ वरून ६० टक्के करण्यात आला असून सुमारे १६ लाख कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनर्सना याचा फायदा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये DA मध्ये तब्बल २० टक्के वाढ जाहीर करण्यात आली असून तो ३८ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
दरम्यान, बँक कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या DA मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष पुढील DA वाढ आणि 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. पुढील वाढीबाबत अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.