

उद्या सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी काही राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार असेल, तर आधी आपल्या शहरातील आणि राज्यातील सुट्टीची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी आणि संबंधित सणांमुळे देशातल्या काही भागांत बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
गणेश चतुर्थी, गणेश पूजा, वरसिद्धी विनायक व्रत, विनायकर चतुर्थी आणि काही ठिकाणी हरतालिका तीज यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा आणि तेलंगणा या राज्यातल्या काही शहरांमध्ये बँका बंद राहतील. मुंबई, नागपूर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पणजी आणि विजयवाडा यांसारख्या शहरांचा यात समावेश आहे.
या दिवशी SBI, PNB, Bank of Baroda, Canara Bank, Axis Bank, HDFC Bank, ICICI Bank यांसह सरकारी आणि खासगी बँकांच्या संबंधित शाखांमध्ये नियमित कामकाज होणार नाही. मात्र, सुट्टी नसलेल्या इतर राज्यांमध्ये बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
१५ सप्टेंबर - संवत्सरी, नुआखाई आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने काही शहरांमध्ये सुट्टी.
२० सप्टेंबर - रविवार.
२१ सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव आणि श्री नारायण गुरू समाधीमुळे काही भागांत सुट्टी.
२२ सप्टेंबर - करमा पूजेमुळे रांचीमध्ये बँका बंद.
२३ सप्टेंबर - महाराजा हरि सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये सुट्टी.
२५ सप्टेंबर - इंद्रजात्रेमुळे गंगटोकमध्ये बँका बंद.
२६ सप्टेंबर - चौथा शनिवार.
२७ सप्टेंबर - रविवार.
बँकेची शाखा बंद असली तरी UPI, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग आणि ATM सारख्या डिजिटल सेवा सामान्यत: वापरता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.