Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

Sakshi Sunil Jadhav

सकाळी ध्यान करा

दिवसाची सुरुवात 5-10 मिनिटांच्या ध्यानाने किंवा दीर्घ श्वास घेऊन केल्यामुळे मन शांत राहतं आणि ताण कमी होण्यास मदत होते.

Practice morning meditation

कोवळे ऊन

नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे मूड सुधारण्यास मदत होते आणि शरीराचे झोप-जागरणाचे चक्र संतुलित राहते.

Get some gentle sunlight

या गोष्टी टाळा

सकाळी नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया पाहणे टाळल्याने माहितीचा ताण, तुलना आणि अनावश्यक चिंता कमी होऊ शकते.

Avoid these things

हलका व्यायाम करा

स्ट्रेचिंग, योग किंवा काही मिनिटे चालणे यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि तणाव नियंत्रित करण्यास मदत होते.

Avoid these things

पौष्टिक नाश्ता करा

प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेला नाश्ता केल्याने ऊर्जा टिकून राहते आणि मूड व एकाग्रता सुधारण्यास मदत होते.

morning meditation

दिवसाचे नियोजन

जर्नलमध्ये भावना, उद्दिष्टे किंवा दिवसभरातील कामांची यादी लिहिल्याने मानसिक गोंधळ कमी होतो आणि नियंत्रणाची भावना वाढते.

deep breathing

कृतज्ञतेच्या गोष्टी आठवा

सकाळी किमान एक-दोन चांगल्या गोष्टी लिहिल्याने सकारात्मक विचार वाढायला आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होऊ शकते.

sunlight benefits

शांत राहा

उठल्यानंतर काही मिनिटे स्वतःसाठी दिल्याने बाहेरील दबाव कमी होतो आणि दिवसाची सुरुवात जास्त शांतपणे करता येते.

sunlight benefits

झोपेची वेळ नियमित ठेवा

दररोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे जैविक घड्याळ संतुलित राहते, ज्याचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.

sunlight benefits

NEXT : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

divorce trend | meta ai
येथे क्लिक करा