Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

Sakshi Sunil Jadhav

रिलेशनॅशिप टिप्स

सोशल मीडियावर रिलेशनशिप कंटेट तयार करणाऱ्या वनराज आणि श्री या कपलने लग्न तुटण्यामागची काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.

reasons for divorce

पारंपरिक अपेक्षांचा संघर्ष

करिअर करणारी पत्नी हवी, पण घरातील सर्व पारंपरिक जबाबदाऱ्याही तिच्याकडूनच अपेक्षित असणे नात्यात तणाव निर्माण करू शकते.

reasons for divorce

स्वातंत्र्यावर दुहेरी निकष

महिलेला आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य देण्याची भाषा केली जाते; मात्र तिच्या निर्णयांशी असहमती असल्यास तेच स्वातंत्र्य नाकारले जाते.

marriage problems

लग्नासाठी खर्च

लग्नावर मोठा खर्च केला जातो, पण संवाद, समुपदेशन आणि वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी पुरेसा प्रयत्न केला जात नाही.

relationship tips

‘अॅडजस्ट’ करण्याची जबाबदारी

लग्नानंतर नवीन घर, कुटुंब आणि परंपरांशी जुळवून घेण्याची अपेक्षा अनेकदा फक्त महिलेकडून केली जाते.

marriage breakdown

घरकामाची समान जबाबदारी नसणे

घर आणि मुलांची जबाबदारी दोघांची असतानाही पुरुषाने घरकाम केले तर त्याला ‘मदत’ मानणे नात्यात नाराजी वाढवू शकते.

marital issues

महिलांकडून सतत त्यागाची अपेक्षा

करिअर, माहेर आणि स्वतःच्या आयुष्यात मोठे बदल केल्यानंतरही त्याला सहज ‘समझोता’ म्हणून पाहिल्यास मनात नाराजी निर्माण होऊ शकते.

couple relationship

पालकांचा वाढता हस्तक्षेप

‘माझ्या आईला आवडत नाही’ किंवा ‘माझे घर काय म्हणेल?’ अशा सततच्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नीमधील निर्णय घेण्याची मोकळीक कमी होऊ शकते.

communication in marriage

जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न

लग्नानंतर समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे बदलेल, या विचाराने केलेले लग्न भविष्यात निराशेचे कारण ठरू शकते.

family interference

नाते कसे टिकवायचं?

पैशांचे नियोजन, मतभेद हाताळणे, भांडणानंतर संवाद साधणे आणि कुटुंबीयांसोबत सीमा ठरवणे याबाबतचा संवाद नसेल तर नात्यात दुरावा वाढू शकतो.

marriage advice

NEXT: रोज एकच नाश्ता खाणाऱ्यांनो सावधान! या 6 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

same breakfast every day | meta ai
येथे क्लिक करा