

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट
फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी
मागणी मान्य झाल्यास पगारात ५१००० रुपयांची वाढ होणार
निवृत्ती वेतनधारकांना देखील याचा फायदा होईल
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत निवृत्ती वेतनधारकांना देखील याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आठव्या वेतन आयोगामध्ये आतपर्यंतची सर्वात मोठी मागणी ही फिटमेंट फॅक्टरची आहे. जर ही मागणी मान्य झाली तर ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. त्याचसोबत ६९ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही याचा फायदा होईल.
सध्या आठव्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू आहेत. चेन्नई आणि पुदुचेरी येथील बैठकांनंतर आता १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान चंदीगड येथे बैठका होणार आहेत. दरम्यान चेन्नईमधील सर्वात मोठी मागणी ही फिटमेंट फॅक्टर ३.८३ पर्यंत वाढवण्याची आहे. अनेक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटना, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी आणि इतर हितधारकांसोबतच्या चर्चेत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.
महत्वाचे म्हणजे, मोदी सरकारने ही मागणी मान्य केली तर ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. ही मागणी मान्य केल्यामुळे स्तर १ च्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात ५१००० रुपयांची वाढ होऊ शकते. त्याचसोबत विविध वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल. ६९ लाख निवृत्ती वेतनधारकांची देखील चांदी होऊ शकते.
फिटमेंट फॅक्टरबद्दल सांगायचे झाले तर, ते 'नवीन मूळ वेतनः सध्याचे मूळ वेतन x एफएफ' असे आहे. सध्या, ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ६ व्या वेतन आयोगाच्या ७,००० रुपयांवरून १८,००० रुपयांपर्यंत वाढले होते. आता जर फिटमेंट फॅक्टर ३.८३ पर्यंत वाढवले तर १८,००० रुपयांचे किमान मूळ वेतन (₹१८,००० x ३.८३ = १६८,९४०) होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात थेट ५०,९४० रुपयांची वाढ होईल.
त्याचसोबत, स्तर २ ते १० च्या वेतनवाढीबाबत सांगायचं झालं तर, स्तर २ च्या कर्मचाऱ्याचा १९,९०० रुपये असलेला मूळ पगार थेट वाढून ७६,२१७ रुपये होईल. तर स्तर ३ च्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार २१,७०० वरून ८३,१११ रुपये होईल. स्तर ४ च्या कर्मचाऱ्याचा किमान पगार २५,५०० वरून १९७,६६५ रुपये होईल, स्तर ५ च्या कर्मचाऱ्याचा किमान पगार २९,२०० वरून १११,८३६ रुपये होईल, स्तर ६ च्या कर्मचाऱ्याचा किमान पगार ३५,४०० वरून ११३५,५८२ रुपये होईल. तसंच, स्तर १० च्या कर्मचाऱ्याचा किमान पगार ५६,१०० वरून १११४,८६३ रुपये होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.