8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! वार्षिक इन्क्रिमेंट 7% होणार? इन्क्रिमेंटबाबत मोठी अपडेट समोर

Central Government Employees: आठव्या वेतन आयोगाच्या चेन्नई बैठकीत वार्षिक इन्क्रिमेंट वाढीवर चर्चा होणार आहे. कर्मचारी संघटनांनी ६ ते ७ टक्के वाढीची मागणी केली असून, अंतिम निर्णयानंतर पगारावर परिणाम स्पष्ट होईल.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या बैठका ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान दक्षिण भारतात होत आहेत. ७ आणि ८ सप्टेंबप रोजी चेन्नई येथे बैठक होणार असून, ९ सप्टेंबरला आयोग पुडुचेरीमध्ये कर्मचारी आणि पेन्शनर्सशी संबंधित संघटनांची मते जाणून घेणार आहे. याआधी आयोगाच्या बैठका लखनऊ आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये झाल्या आहेत.

या बैठकीत फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA), वार्षिक इन्क्रिमेंट, HRA तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पोस्टिंग आणि ट्रान्सफर यांसारख्या मु्द्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांकडून वार्षिक इन्क्रिमेंट वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.

8th Pay Commission
Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

७ टक्के वार्षिक इन्क्रिमेंटची मागणी

NC-JCM ने वार्षिक इन्क्रिमेंटमध्ये ६ टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन यांनीही ६ टक्के वाढीचा प्रस्ताव मांडला आहे. तर ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉयी फेडरेशनने ७ टक्के वार्षिक इन्क्रिमेंटची मागणी केली आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

पगारावर किती परिणाम होऊ शकतो?

अंदाजे, सध्याच्या सातव्या वेतन आयोगात लेव्हल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. ३ टक्के वार्षिक इन्क्रिमेंट कायम राहिल्यास १० वर्षानंतर बेसिक सॅलरी २३,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. लेव्हल आठच्या कर्मचाऱ्यांचे सध्याची बेसिक सॅलरी ४७,६०० रुपये गृहीत धरून, २.१५ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर ते १,०२,३४० रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर ३,५ किंवा ७ टक्के वार्षिक इन्क्रिमेंटनुसार दीर्घकाळात वेतनात मोठा फरक पडू शकतो.

दिलेल्या गणनेनुसार १० वर्षांनंतर ७ टक्के इन्क्रिमेंटच्या परिस्थितीत वार्षिक सॅलरी २२.५८ लाख रुपये होऊ शकते. पण अंतिम फिटमेंट फॅक्टर, इन्क्रिमेंटचा दर आणि इतर वेतनाविषयक निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com