Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

Career Growth : अनेक वर्षांचा अनुभव असूनही पगारवाढ मिळत नसेल, तर कारण फक्त कंपनी नाही. त्यासाठी तुमची कौशल्यही महत्त्वाची असतात.
Salary Hike
Salary Hike meta ai
Published On

नोकरीत अनेक वर्षे झाली, अनुभवही वाढलेला असेल मात्र अपेक्षेप्रमाणे पगारवाढ मिळत नाही, अशी अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार असते. पण फक्त कंपनीत किती वर्षे काम केले यावर पगारवाढ ठरत नाही. तुमची कामगिरी, कौशल्ये, कंपनीतील योगदान आणि बाजारातील तुमची ‘मार्केट व्हॅल्यू’ याचाही मोठा विचार केला जातो.

पगारवाढीचा विचार करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाची गुणवत्ता आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी ही आहे. बाजारात सतत नवे ट्रेंड, तंत्रज्ञान आणि टूल्स येत असतात. त्यानुसार स्वत:ला अपडेट न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी तुलनेने कमी होऊ शकते.

Salary Hike
Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

याशिवाय तुमच्या कामगिरीत सातत्य आहे का, तुम्ही कंपनीसाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या घेत आहात का आणि तुमच्या कामाचा प्रत्यक्ष व्यवसायावर काय परिणाम होतो, याकडेही व्यवस्थापनाचे लक्ष असते. फक्त दिलेले काम पूर्ण करण्यापेक्षा समस्या सोडवणे, नवीन कल्पना मांडणे आणि टीमला उपयोगी ठरणे यामुळे कर्मचारी अधिक मूल्यवान ठरतो.

मार्केट व्हॅल्यू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या क्षेत्रात सध्या कोणत्या कौशल्यांना जास्त मागणी आहे, यासाठी किती पगार दिला जातो आणि तुमची कौशल्ये त्याला कितपत अनुरूप आहेत, याचा वेळोवेळी आढाव्या घ्या.

Salary Hike
Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

सुरुवातीच्या १ ते ३ वर्षात बेसिक कौशल्ये विकसित होण्याचा काळ असतो. त्यानंतर नवनवीन टूल्स, सर्टिफिकेशन्स आणि अपडेट तंत्रज्ञानाचे ज्ञान घेतल्याने पगारवाढीच्या संधी वाढू शकतात. उलट अनेक वर्षे फक्त मॅन्युअल पद्धतीने काम करत राहिल्याने करिअरची वाढ मंदावू शकते.

अनुभवाबरोबर मॅनेजमेंट स्किल्स, नवीन तंत्रज्ञान आणि विशेषत:AI टूल्सचा वापर आत्मसात केल्याने तुमची व्यावसायिक किंमत वाढू शकते. त्यामुळे पगारवाढ न मिळाल्यास फक्त कंपनीला दोष देण्याऐवजी स्वत:च्या कौशल्यांचा आणि कामगिरीचा आढावा घेणं महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com