Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Sakshi Sunil Jadhav

लिव्हरच्या समस्या

लिव्हर आणि किडनीला तुम्ही स्वत:च्या हाताने निकामी करत असता. त्याने भविष्यात तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो.

liver damage | pintrest

गोळ्यांचा अतिरेक

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधांचे सतत सेवन किडनीवर ताण आणू शकते.

harmful habits

जास्त मद्यपान

अतिमद्यपानामुळे फॅटी लिव्हर, हेपेटायटिस आणि सिरोसिसचा धोका वाढू शकतो.

liver disease

धूम्रपानाची सवय

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

liver care tips

जास्त मीठ खाणे

अतिरिक्त मीठामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि किडनीवर जास्त ताण पडू शकतो.

organ health

जास्त साखर सेवन

गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेयांमुळे लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

prevent liver damage

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड

पॅकेज्ड आणि अतिप्रक्रियायुक्त पदार्थांचा नियमित अतिरेक लिव्हर-किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

prevent liver damage

शरीरात पाण्याची कमतरता

पुरेसे पाणी न प्यायल्याने किडनीवर ताण वाढू शकतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

prevent liver damage

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सतत थकवा, पायांना सूज, लघवीत बदल, कावीळ किंवा पोटाला सूज जाणवल्यास वेळीच वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे आहे. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

prevent liver damage

NEXT: वजन कमी करण्यासाठी सकाळी प्यायला उपयुक्त 7 हेल्दी ड्रिंक्स; जाणून घ्या फायदे

weight loss diet
येथे क्लिक करा