8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फिटमेंट फॅक्टरनुसार मिळू शकतो ₹14.10 लाखांपर्यंत एरियर, महत्त्वाची अपडेट समोर

Salary Hike : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत उशीर झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा एरियर मिळण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार लेव्हल ४ ते ७ कर्मचाऱ्यांना लाखोंची थकबाकी मिळू शकते.
8th Pay Commission
8th Pay Commissiongoogle
Published On

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अहवालाची आणि अंमलबजावणीची वाट सध्या लाखो कर्मचारी करत आहेत. आयोग लागू करायसा उशीर झाल्यावर कर्मचाऱ्यांना मागच्या कालावधीचा पगार म्हणजेच एरियर मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेव्हल ४ ते लेव्हल ७ मधल्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरनुसार मोठी थकबाकी मिळू शकते.

एरियरमध्ये नेमके काय मिळते?

सॅलरीत बेसिक पे, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता (TPTA) असे वेगवेगळे घटक असतात. मात्र, दिलेल्या अंदाजानुसार एरियरची गणना बेसिक पेच्या वाढीवर केली जाते. DA, HRA आणि TPTA वरील थकबाकीचा समावेश यामध्ये केला जात नाही.

8th Pay Commission
PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 येणार; PF क्लेम सेटलमेंट होणार एका झटक्यात, पाहा अपडेट

२० महिन्यांचा उशीर झाल्याने एरियर किती होणार?

जर आठवा वेतन आयोग लागू होण्यास २० महिन्यांचा उशीर झाला, तर फिटमेंट फॅक्टरनुसार एरियरची रक्कम बदलू शकते.

२.० फिटमेंट फॅक्टर - लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना सुमारे ५.१० लाख रुपये, लेव्हल ५ ला ५.८२ लाख, लेव्हल ६ ला ७.०८ लाख आणि लेव्हल ७ ला ८.९८ लाख एरियर मिळू शकतो.

२.१५ फिटमेंट फॅक्टर - लेव्हल ४ ते ७ साठी अंदाजे ५.८७ लाख ते १०.३३ लाखांपर्यंत एरियर होऊ शकतो.

8th Pay Commission
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार २,००० रुपये! पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही? असा तपासा स्टेटस!

२.२८ फिटमेंट फॅक्टर - या परिस्थितीत एरियर ६.५३ लाखांपासून ११.४९ लाखांपर्यंत जाऊ शकतो.

२.५७ फिटमेंट फॅक्टर - लेव्हल ४ साठी अंदाजे ८.०१ लाख, लेव्हल ५ साठी ९.१४ लाख, लेव्हल ६ साठी ११.१२ लाख, तर लेव्हल ७ कर्मचाऱ्यांना तब्बल १४.१० लाखांपर्यंत एरियर मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, हे सर्व आकडे फक्त अंदाजे आहेत. प्रत्यक्ष एरियर किती मिळणार, नवीन बेसिक पे किती असेल आणि कोणता फिटमेंट फॅक्टर लागू होईल, हे सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com