PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 येणार; PF क्लेम सेटलमेंट होणार एका झटक्यात, पाहा अपडेट

PF Update : EPFO 3.0 मध्ये पीएफ क्लेम सेटलमेंट जलद करण्यासाठी क्लाउड सिस्टम, ऑटो सेटलमेंट आणि ATM- UPI च्या मदतीने पीएफ काढण्याच्या प्रस्तावित सुविधांचा समावेश होऊ शकतो.
PF New Rules 2026
PF New Rules 2026meta ai
Published On

तुम्ही तुमच्या कंपनीत पीएफ (PF) जमा करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या IT प्रणालीमध्ये मोठा बदल करून EPFO 3.0 आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या नव्या प्रणालीचा मुख्य उद्देश पीएफशी संबंधित सेवा जास्त वेगवान, सोप्या आणि डिजिटल करणे हा आहे.

५ लाखांपर्यंतचे क्लेम ३ ते ४ दिवसांत

रिपोर्टनुसार, EPFO 3.0 अंतर्गत आजारपण, लग्न, घर खरेदी यांसारख्या कारणांसाठी केलेल्या ५ लाखांपर्यंतच्या अॅडव्हान्स क्लेमचे सेटलमेंट ३ ते ४ दिवसांत करण्याचे लक्ष्य असू शकते. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर क्लेमची तपासणी डिजिटल पद्धतीने होऊन ऑटो - सेटलमेंटचा वापर वाढवला जाऊ शकतो. मात्र, या प्रस्तावाची अद्याप अधिकृत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

PF New Rules 2026
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार २,००० रुपये! पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही? असा तपासा स्टेटस!

क्लाउड-बेस्ड होणार EPFO सिस्टम

सध्या EPFOची माहिती आणि प्रक्रिया विविध प्रादेशिक कार्यालयांच्या सर्व्हरशी संबंधित असल्यामुळे अनेकदा पोर्टलवर तांत्रिक अडचणी किंवा सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाली आहे. नव्या EPFO 3.0 प्रणालीमध्ये क्लाउड-बेस्ड आणि जास्त सेंट्रलाइज्ड व्यवस्था आणण्याची योजना आहे. त्यामुळे ऑनलाइन सेवा जास्त स्थिर आणि जलद होईल अशी अपेक्षा आहे.

PF New Rules 2026
Water Intake: पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

ATM आणि UPIद्वारे PF काढता येणार?

EPFOच्या डिजिटल सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ATM आणि UPIद्वारे PFमधून पैसे काढण्याच्या पर्यायावरही विचार होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः वैद्यकीय आणीबाणी किंवा छोट्या अॅडव्हान्ससाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते. मात्र, ही सुविधा सध्या लागू झालेली नाही. त्यासाठी अधिकृत नियम आणि प्रक्रिया जाहीर होणे आवश्यक आहे.

लॉन्चला उशीर का?

EPFO 3.0 मधील काही सुविधा जुलैमध्ये सुरू होण्याची चर्चा होती. मात्र, वेबसाइट आणि तांत्रिक प्रणालीतील अडचणींमुळे लॉन्च पुढे ढकलण्यात आले. ऑगस्टनंतर आता सप्टेंबरमध्ये काही फीचर्स सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. EPFOची अधिकृत घोषणा होईपर्यंत लॉन्चची तारीख आणि सुविधांबाबत अंतिम निर्णय झालेला मानता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com