PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार २,००० रुपये! पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही? असा तपासा स्टेटस!

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. हप्ता ऑक्टोबर २०२६ मध्ये येण्याची शक्यता आहे. घरबसल्या स्टेटस, लाभार्थी यादी आणि e-KYC तपासायची प्रोसेस जाणून घ्या.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana meta ai
Published On

पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत देशातल्या पात्र शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला ६००० रुपये (PM Kisan 6000 Rupees) दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी २००० रूपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.

पीएम किसानचा २३ वा हप्ता (PM Kisan 23rd Installment) २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात २००० रूपयांची रक्कम DBT (Direct Benefit Transfer) ने पाठवण्यात आली होती. आता शेतकऱ्यांचं लक्ष २४व्या हप्त्याकडे लागलं आहे.

PM Kisan Yojana
Water Intake: पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

२४ वा हप्ता कधी मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार PM Kisan 24th Installment ऑक्टोबर २०२६च्या आसपास जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी अधिकृत अपडेटची वाट पाहावी. तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

PM Kisan Yojana
Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

घरबसल्या PM Kisan Status कसा तपासाल?

तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर PM Kisan Beneficiary Status घरबसल्या तपासता येतो. त्यामध्ये तुम्हाला Payment Status, Bank Name, UTR Number आणि पैसे जमा झाल्याची तारीख अशी महत्त्वाची माहिती पाहता येते.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

Know Your Status या ऑप्शनवर क्लिक करा

तुमचा Registration Number आणि कॅप्चा भरा.

नोंदणीकृत मोबाइलवर आलेला OTP टाका.

यानंतर स्क्रीनवर तुमचा पेमेंट स्टेटस दिसेल.

e-KYC पूर्ण असेल तरच हप्ता

पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी पीएम किसान इ केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे. e-KYC अपूर्ण असेल तर हप्ता मिळायला अडचणी येऊ शकतात. याशिवाय आधार, बँक खातं आणि जमीनविषयक नोंदी अचूक आहेत की नाही, हेही तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com