Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

Sakshi Sunil Jadhav

पित्तात्रा त्रास

जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास होतो तेव्हा छातीत किंवा घशात जळजळ, आंबट ढेकर आणि पोटात अस्वस्थता अशी लक्षणे जाणवू शकतात. असं सतत होत असेल तर त्यामागचं कारण जाणून घेतलं पाहिजे.

acidity home remedies

त्रिफळा चूर्णाचा वापर

आयुर्वेदात त्रिफळा हे पारंपरिकरित्या वापरलं जाणारं मिश्रण आहे. मात्र पित्त किंवा अॅसिडिटी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

Triphala for acidity

गरम पाण्यासोबत घेण्याची पद्धत

काहीजण रात्री झोपण्याआधी गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण मिसळून घेतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्याने ही पद्धत सर्वांना योग्य असेलच असं नाही.

Triphala churna

चूर्ण किती प्रमाणात घ्यावे?

१ चमचा चूर्ण पुरेसं असतं. पण स्वत:हून प्रमाण ठरवण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं सुरक्षित ठरते.

GERD symptoms

पित्त वाढण्याची कारणे

जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ, जास्त चहा-कॉफी आणि वेळेवर जेवण न केल्यामुळे काही लोकांमध्ये त्रास वाढू शकतो.

Ayurvedic remedies for acidity

आहारात बदल करा

पित्ताचा त्रास असेल तर आहारात तिखट, तेलकट आणि जड पदार्थांचा समावेळ हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.

Ayurvedic remedies for acidity

त्रिफळाचे दुष्परिणाम

काहींना त्रिफळा घेतल्याने जुलाब, पोटात कळ किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. अशी लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Triphala benefits

सतत पित्त होत असेल तर...

अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ सतत होत असेल तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. सतत होणाऱ्या त्रासामागे GERD, अल्सर किंवा इतर कारणे असू शकतात.

Triphala benefits

तज्ज्ञांचा सल्ला

विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले किंवा नियमित औषधे घेणाऱ्यांनी त्रिफळा सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच कोणतीही औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच साम टिव्ही याचे समर्थन किंवा दावा करीत नाही.

Triphala benefits

NEXT : अर्धा लिंबू उरलाय? फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी 'ही' सोपी ट्रिक करा, अनेक दिवस राहील ताजा, रसही आटणार नाही

Lemon Storage Tips
येथे क्लिक करा