DA Hike : DA वाढला तर खात्यात किती रुपये येणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा सोपा हिशोब समजून घ्या

Government Employees Salary : DA मध्ये ३ टक्के वाढ झाली तर संपूर्ण पगारावर नाही, तर बेसिक पेवर हिशोब केला जातो. बेसिक पे आणि कपातींनुसार कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष पगारात होणारी वाढ ठरते.
DA Hike
DA Hikemeta ai
Published On

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्ता म्हणजेच DA वाढण्याची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच महत्त्वाची असते. मात्र DA मध्ये ३ टक्के रक्कम वाढते, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात DA चे गणिक बेसिक पेवर होतं.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार ४०,००० रुपये असून सध्या DA ६० टक्के असेल, तर त्याला २४,००० रुपये DA मिळतो. DA ६० वरून ६३ टक्के झाल्यावर नवीन DA २५,२०० रुपये होईल. म्हणजेच दरमहा १,२०० रुपयांची वाढ होईल. वर्षभरात ही वाढ १४,४०० रुपये इतकी होऊ शकते.

DA Hike
Business Loan : सरकार देणार ₹5 लाखांपर्यंत क्रेडिट कार्ड! अट फक्त एकच

याच पद्धतीने बेसिक पे वेगवेगळा असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा फायदा वेगळा असतो. ३०,००० रुपये बेसिक असलेल्या कर्मचाऱ्याला DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्याने ९०० रुपये जास्त मिळतील. तर ५०,००० रुपये बेसिक असलेल्या कर्मचाऱ्याला १,५०० रुपयांचा फायदा होईल.

DA Hike
Dal Benefits : गॅस, अ‍ॅसिडिटी टाळायचीय? मग डाळ निवडताना डॉक्टरांचा हा सल्ला दुर्लक्षित करू नका

मात्र DA वाढल्यानंतर संपूर्ण वाढलेली रक्कम थेट खात्याम जमा होईलच असं नाही. आयकर आणि इतर लागू कपातींमुळे टेक-होम सॅलरीमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे DA वाढीचा अचूक फायदा जाणून घेण्यासाठी आधी बेसिक पे तपासणे आवश्यक आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA मध्ये जानेवारी आणि जुलै या कालावधीशी संबंधित सुधारणा केली जाते. या बदलामागे महागाईचा परिणाम लक्षात घेतला जातो. आणि CPI-IW म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधार घेतला जातो.

महत्त्वाचं म्हणजे Pay Commission आणि DA Revision या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वेतन आयोगाचा कालावधी संपला तरी DA मध्ये सुधारणा होण्याची प्रोसेस स्वतंत्रपणे सुरू राहू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्याचं समजल्यावर संपूर्ण पगारावर ३ टक्के गणना करू नका. बेसिक पे × टक्केवारी = DA हा सोपा हिशोब करा. जुन्या DA मधून नवीन DA वजा केल्यावर तुमच्या पगारात किती वाढ होणार हे सहज समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com