Sakshi Sunil Jadhav
आपल्या प्रत्येकाच्याच घरात डाळीला विशेष महत्त्व असतं. प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक मिळवण्यासाठी डाळ हा स्वस्त मार्ग आहे.
पचनाशी संबंधित त्रास किंवा जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल, तर पिवळी सोललेली मूग डाळ हलकी असते.
प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी मसूर डाळ आहारात घ्या. १०० ग्रॅम डाळीतून २४ ग्रॅम प्रथिने मिळतात.
चणा डाळीत फायबरचं प्रमाण चांगलं असतं आणि तिचा ग्लायसेमिक प्रभाव तुलनेने कमी असतो.
अख्खे हिरवी मूग डाळ फायबरचा चांगला स्त्रोत आहे आणि काही लोकांना ती इतर जड डाळींच्या तुलनेच पचायला सोपी वाटू शकते.
डाळ काही तास पाण्यात भिजवल्याने तिचा स्वयंपाकाचा वेळ कमी होण्यास आणि पचन क्रिया सुधारते.
डाळ नीट शिजली तर ती मऊ होते आणि पचनासाठी तुलनेने सोपी ठरते. त्यामुळे अपुरी शिजलेली डाळ खाऊ नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.