Business Loan : सरकार देणार ₹5 लाखांपर्यंत क्रेडिट कार्ड! अट फक्त एकच

Small Business Loan : छोट्या व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता उद्योजकांना ५ लाखांपर्यंत लोन मिळू शकतं. मात्र याची पात्रता जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Business Loan
Business Loan meta ai
Published On

तुम्ही सुद्धा छोटा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या काही योजनांमधून छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळते. यामध्ये आता मायक्रो एंटरप्राइजेससाठी सुरू करण्यात आलेल्या मायक्रो क्रेडिट कार्ड (ME-Card)सुविधेचा समावेश आहे. या कार्डाच्या मदतीने पात्र छोट्या उद्योगांना ५ लाखापर्यंतची प्री-अप्रूव्ह्ड रिव्हॉल्विंग क्रेडिट लिमिट मिळू शकते. छोट्या व्यवसायांना वर्किंग कॅपिटल सहज उपलब्ध करून देणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे.

कोणाला मिळू शकतो लाभ?

तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मायक्रो एंटरप्राइजेसची उद्यम पोर्टलवर नोंदणी असणं आवश्यक आहे. मात्र, कार्ड जारी करायचं की नाही आणि किती क्रेडिट लिमिट द्यायची, याचा अंतिम निर्णय संबंधित बँक किंवा कर्जदात्याच्या क्रेडिट तपासणी आणि धोरणांनुसार होईल.

Business Loan
फ्रिजमध्ये ठेवूनही लिंबू सुकतंय? ही सोपी ट्रिक वापरा, बराच काळ राहील फ्रेश आणि रसाळ...

सुरुवातीच्या अर्जदारांसाठी जॉइनिंग फी आकारली जात नाही. वार्षिक शुल्क कार्डच्या क्रेडिट लिमिटच्या जास्तीत जास्त १ टक्के किंवा १००० रुपयापैकी जी रक्कम कमी असेल ती असू शकते. प्रोसेस जलद करण्यासाठी UPI, Account Aggregator Framework आणि डिजिटल अर्जाचा वापर केला जातो.

Business Loan
Dal Benefits : गॅस, अ‍ॅसिडिटी टाळायचीय? मग डाळ निवडताना डॉक्टरांचा हा सल्ला दुर्लक्षित करू नका

पैसे कुठे वापरता येतील?

व्यावसायिक या कार्डाचा वापर व्यवसायाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करता येऊ शकतो. कच्चा माल खरेदी करणं, स्टॉक वाढवणं, रोजचं व्यावसायिक खर्च भागवणं किंवा काही काळासाठी निर्माण झालेली रोख रकमेची कमतरता भरून काढणं यासाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com