8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

8th Pay Commission Arrears: आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाखोंचा एरियर मिळण्याचा अंदाज आहे. २.५७ फिटमेंट फॅक्टरवर लेव्हल ७ कर्मचाऱ्यांना १४.१० लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो.
8th Pay Commission
8th Pay Commission meta ai
Published On

आठव्या वेतन आयोगाच्या अहवालाची केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाचा अहवाल येण्यास उशीर होत असल्यामुळे त्याची अंमलबजावणीही काही वेळ लांबण्याची शक्यता आहे. मात्र, या उशिराचा फायदा कर्मचाऱ्यांना एरियरच्या स्वरुपात मिळू शकतो. उपलब्ध अंदाजानुसार, लेव्हल ४ ते लेव्हल ७ मधल्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरनुसार लाखो रुपयांचा थकीत पगार मिळण्याची शक्यता आहे.

एरियरमध्ये नेमकं काय मिळतं?

एरियरचे गणित करताना महत्वाचं म्हणजे सॅलरीतला फरक लक्षात घेतला जातो. महागाई भत्ता म्हणजेच DA, घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता (TPTA) यावर मागच्या कालावधीचा एरियर मिळत नाही, असं या अंदाजात गृहीत धरलं आहे. DA मध्ये महागाईनुसार वर्षातून दोनदा बदल होतो. HRA हा बेसिक सॅलरीच्या प्रमाणात ठरतो, तर TPTA हा ठरलेला भत्ता असून DA वाढीनुसार त्यात बदल होतो. त्यामुळे या भत्त्यांचा एरियरच्या गणनेत समावेश केला जात नाही.

8th Pay Commission
Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

२.१५ फिटमेंट फॅक्टरनुसार एरियर

२.१५ फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्यावर लेव्हल ४ साठी अंदाजे ५.८७ लाख, लेव्हल ५ साठी ६.६९ लाख, लेव्हल ६ साठी ८.१४ लाख, तर लेव्हल ७ साठी १०.३३ लाख एरियर होऊ शकतो.

8th Pay Commission
Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

२.२८ फिटमेंट फॅक्टरवर किती एरियर?

२.२८ फिटमेंट फॅक्टरनुसार लेव्हल ४ साठी ६.५३ लाख, लेव्हल ५ साठी ७.४५ लाख, लेव्हल ६ साठी ९.०६ लाख आणि लेव्हल ७ साठी ११.४९ लाख एरियरचा अंदाज आहे.

२.५७ फिटमेंट फॅक्टर ठरल्यास?

२.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्याने लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना सुमारे ८.०१ लाख, लेव्हल ५ ला ९.१४ लाख, लेव्हल ६ ला ११.१२ लाख, तर लेव्हल ७ कर्मचाऱ्यांना तब्बल १४.१० लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो. मात्र हे सर्व आकडे फक्त अंदाजे आहेत. सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या नवीन वेतनदरांची अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच एरियरची वास्तविक रक्कम स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com