Sakshi Sunil Jadhav
तांदळाचे पीठ, गूळ, ताजे खोबरे, वेलची पूड, तूप आणि चिमूटभर मीठ हे साहित्य आधी तयार ठेवा.
कढईत खोबरे आणि किसलेला गूळ घालून मंद आचेवर परतवा आणि मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड मिसळा.
पाण्यात थोडे मीठ आणि तूप घालून उकळी आणा, त्यात तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित ढवळा आणि झाकून काही मिनिटे ठेवा.
पीठ कोमट असतानाच चांगले मळून घ्या, त्यामुळे पटोळ्यांचे आवरण मऊ आणि लाटण्यासाठी सोपे होते.
पिठाच्या थराच्या मध्यभागी तयार केलेले गूळ-खोबऱ्याचे सारण ठेवून पान अर्धे दुमडा.
तयार पातोळ्या स्टीमरमध्ये ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजवा.
पातोळ्या पूर्णपणे शिजल्यावर त्या थोड्या थंड होऊ द्या आणि नंतर केळीचे पान हळूहळू काढा.
गरम पातोळ्यांवर थोडं साजूक तूप घालून सर्व्ह करा. गूळ-खोबऱ्याच्या सारणामुळे हा पारंपरिक पदार्थ खास चव देतो.