Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Government News : रेशन कार्डामधीस SC, ST, BC-1, BC-2 आणि PVTG या 5 प्रवर्गांची जात अपडेट प्रोसेस SIR 2026 मुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे.
Ration Card Big Update
Ration Card E KYC News AI Image
Published On

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या रेशन कार्डमध्ये जात माहिती अपडेट करण्याची प्रोसेस सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR २०२६ च्या पार्श्वभूमीवर खाद्य, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे.

विभागाने स्पष्ट केलं आहे की, मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनापर्यंत रेशन कार्डामधील जात अपडेट करण्याची प्रोसेस बंद राहणार आहे. याबाबत सरकारचे उपसचिव राम कृष्ण कुमार यांनी रांची, धनबाद आणि जमशेदपूरसह सर्व जिल्ह्यांच्या संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या आदेशाची प्रत सर्व उपायुक्तांनाही (Deputy Commissioner) पाठवण्यात आली आहे.

Ration Card Big Update
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ₹2,000 मिळवायचे असतील तर आताच करा ही 3 कामे; अन्यथा अडकू शकतो हप्ता

कोणत्या ५ प्रवर्गांची जात अपडेट होणार होती?

रेशन कार्डामध्ये , SC, BC-१, BC-२ आणि PVTG या पाच प्रवर्गांची जात माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी लाभार्थी मोठ्या संख्येने प्रखंड (Block Office) आणि अंचल कार्यालयांमध्ये (Circle Office) जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत होते. मात्र, SIRच्या कामामुळे या अर्जांच्या प्रक्रियेवरही परिणाम होणार आहे.

Ration Card Big Update
DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

SIRच्या कामासाठी कर्मचारी तैनात

राज्यात SIR अंतर्गत मतदार यादीच्या नोटीस टप्प्यात मिळालेले दावे आणि हरकतींची पडताळणी सुरू आहे. या कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपायुक्तांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांतल्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्राचे अर्ज वेळेत निकाली काढणे प्रशासनाला सध्या शक्य होत नसल्याचे विभागाने नमूद केले आहे.

आधीही जारी झाले होते आदेश

रेशन कार्डमधील जात अपडेटबाबत १ जुलै आणि २८ जुलै २०२६ रोजी यापूर्वीही निर्देश देण्यात आले होते. मात्र, आता ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी तथा सचिव, मंत्रिमंडळ (निवडणूक) विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्डमध्ये जात माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतदार यादीचे अंतिम प्रकाशन झाल्यानंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com