Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Gold Rate Today Update News : ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळे सोन्याचा दर ९,२०० रुपयांनी कमी होऊन १ तोळे सोने १,५३,१७० रुपये झाला. २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दरही जाणून घ्या.
Gold Rate Today News
Gold Rate Today News AI Image
Published On
Summary
  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट १० तोळे सोन्याच्या दरात आज तब्बल ९,२०० रुपयांची घट

  • २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,४०,४०० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १,१४,८८० रुपये

  • दरातील घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ९,२०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा २४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,१७० रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे बाजारात खरेदीदारांची उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण असून या काळात सोने-चांदी आणि दागिन्यांची खरेदी करण्याची परंपरा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घट ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर, मागणी-पुरवठा आणि इतर आर्थिक घटकांचा त्यावर परिणाम होतो. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील आजचा ताजा दर जाणून घ्या.

Gold Rate Today News
Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,३१७

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२२,५३६

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५३,१७०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,३१,७००

Gold Rate Today News
Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,०४०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१२,३२०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४०,४००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,०४,०००

Gold Rate Today News
High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,४८८

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९१,९०४

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१४,८८०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,४८,८००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com