नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : किरगिझस्तानमध्ये भयंकर हिंसाचार उफाळला आहे. किरगिझस्तानात स्थानिक विरुद्ध परदेशी असा वाद पेटल्याचे दिसत आहे. किरगिझस्तानमधील नागरिकांकडून परदेशी लोकांवर हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात ७ पाकिस्तानी विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याची देखील माहिती मिळत आहे. या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. या भागात महराष्ट्रातील देखील काही विद्यार्थी अडकले आहेत. राज्यातील अहमदनगरच्या एका विद्यार्थ्याच्या बहिणीने तेथील भयंकर परिस्थिती सांगितली आहे.
किरगिझस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अहमदनगरच्या कर्जतचा विशाल राऊतचा देखील समावेश आहे. विशाल राऊत हा एमबीबीसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. विशाल हा त्याच्या पालकांच्या संपर्कात आहे. विशालची मोठी बहीण सोनाली राऊत यांनी किरगिझस्तानमधील तेथील भयंकर परिस्थितीविषयी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील अडकलेल्या विद्यार्थ्याची बहीण सोनाली राऊत यांनी सांगितलं की, 'किरगिझस्तानमधील परिस्थिती सध्या निवळलेली आहे. मात्र, वातावरण तणावपूर्ण आहे. किरगिझस्तानमधील घटनेमुळे केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी पालकांची अपेक्षा आहे. तेथील परिस्थितीमुळे पालक चिंतेत आहे. अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष संपत असलेलं आहे. त्यामुळे ते परतत आहेत'.
'शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक महिन्याचं शिक्षण अद्याप पूर्ण व्हायचं आहे. त्यामुळे तेथील भारतीय दुतावास आणि केंद्रसरकारने अशा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी पालकांची अपेक्षा आहे. किरगिझस्तानमधील स्थानिक विद्यार्थी आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांमधील संघर्षाचे मुख्य कारण पाकिस्तानी विद्यार्थी आहेत. पाकिस्तानी विद्यार्थ्यांमुळे हा संघर्ष पेटल्याची माहिती आहे. पाकिस्तानी विद्यार्थ्यांबरोबरच भारतातील आणि बांगलादेलमधील विद्यार्थ्यांना देखील लक्ष्य केलं जात आहे. रस्त्यावर दिसेल त्यांना मारत आहेत. हॉस्टेलमध्ये घुसून मारलं जात आहे, असेही त्यांनी सांगितले
किरगिझस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता तिथं कोण अडकले आहेत, याची माहिती समोर येत आहे. याच किरगिझस्तानमध्ये बीड जिल्ह्यातील 10 विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधील अमेर हुसेन यांची मुलगी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण तेथील ओश या ठिकाणी शिक्षण घेत आहे. त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून आता महाविद्यालयाने इन्स्टिट्यूटच्या बाहेर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना निघू दिले जात नाही. वार्डन, प्रिन्सिपल यांच्याकडून सतत विद्यार्थ्यांची पाहणी केली जात आहे. मात्र जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना नेमकं बाहेर काय चाललंय ? हे देखील माहिती मिळत नसल्याचा समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.