Job Survey: भारत होणार सर्वाधिक तरूण; २०३० पर्यंत ११.५ कोटी नोकऱ्या हव्यात!, ताज्या अहवालात नेमकं काय?

Survey About Job Generation In India: जगभरातील सर्वाधिक तरुण हे भारत देशात आहे. त्यामुळे भारत देशात सर्वाधिक काम करणारी माणसे आहेत. भारतातील याच तरुणाईचा योग्य वापर करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील.
Survey About Job Generation In India
Job Saam Digital

जगभरातील सर्वाधिक तरुण हे भारत देशात आहे. त्यामुळे भारत देशात सर्वाधिक काम करणारी माणसे आहेत. भारतातील याच तरुणाईचा योग्य वापर करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. २०३० पर्यंत जवळपास ११.५ कोटी रोजगारनिर्मिती होणा आवश्यक आहे, असे नॅटिक्सिस एसए या जागतिक संस्थेने अहवालात म्हटले आहेत.

भारतात २०३० पर्यंत सर्वाधिक काम करणारी तरुणाई असले. त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा आणि ताकद असेल. याच तरुणाईचा वापर करुन घेण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी नोकऱ्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. २९३० पर्यंत देशातील पाचपैकी तरुण हा एक भारतीय असेल. त्यामुळे रोजगारनिर्मितीभर भर देणे गरजेचे आहे. यासाठी देशात नोकऱ्यांची गरज आहे.

दरवर्षी गेल्या काही दशकातील तुलनेत १.६५ कोटी नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. त्यात १.०४ कोटी नोकऱ्या उपलब्ध करुन द्याव्या लागतील. रोजगार निर्मिती करण्यालाठी उत्पादन क्षेत्र त्याचसोबत सेवा क्षेत्रावर भर द्यावा लागणार आहे. सरकारने या अनुशंगाने अंबलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. त्याचसोबत सध्याच्या राजकीय आणि भौगोलिक स्थितीवर लक्ष द्यायला हवे, असे संस्थेचे वरिष्ठ अर्थतज्त्र ट्रिन्ह गुयेन यांनी सांगितले आहे.

Survey About Job Generation In India
Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

श्रम बाल सर्वक्षणानुसार १५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांचा काम करण्याचा दर सध्या ५०.२ टक्के आहे. तर महिलांचा काम करण्याचा सहभाग वाढला असून तो मागील तीन महिन्यात २०.२ टक्क्यांहून २२.३ टक्के झाला आहे. एवढे असूनदेखील भारतात महिला श्रमशक्तीचा सहभाग तुलनेने कमी आहे. आशिआई देशांमध्ये महिलांचे काम करण्याची संख्या ७५ टक्के आहे. भारताला याबाबतीत योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Survey About Job Generation In India
NIA Raid: ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com