संजय जाधव, बुलढाणा|ता. १२ जून २०२४
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावघुबे गावाला वादळाचा तडाखा बसला. यावेळी झोक्यात झोपलेली सहा महिन्याची मुलगी घरावरील छतासह उडून गेली. या दुर्घटनेत चिमुकलीचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. अनेक घरांवरील छत उडून गेली, अनेक झाडेही पडली. अशातच चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घटना घडली. मोठ्या वादळी वाऱ्याने घरावरील छत उडाले, यावेळी घरात छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती.
झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगलला बांधलेला होता. वादळाने अँगलसह छत व चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेला. साधारणतः २०० फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई भरत साखरे (वय, ६ महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसुर येथे गोठ्यातीलजनावरांची राखण करण्यासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्धाच्या अंगावर गोठा कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नारायण सुखदेव सुरवसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जोरदार पाऊस झाल्याने गोठा जीर्ण होऊन कोसळल्याने ही घटना घडल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.