मयुर राणे, मुंबई|ता. १२ जून २०२४
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ तसेच पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. त्यानुसार किशोर जैन यांचे उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
तसेच "नाना पटोले हे मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत ते आमचे मित्र आहेत. मुंबईचा पदवीधर मतदार संघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकते आहे, ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे, असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मनाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं. 158 जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसाला असला तरी आम्हाला विधानसभा निवडणुकीत सावधगिरीने पावलं उचलावं लागतील. आमची अपेक्षा १८० जागांची आहे. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकारी येईल. आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.