बीड शहरातल्या शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी
जरांगे पाटील गाडीतून उतरून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार
मनोज जरांगे पाटील हे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल झाले असून त्यांचे बीडकरांकडून जंगी स्वागत करण्यात आले. बीडच्या शिवतीर्थावरती मनोज जरांगे पाटील यांचा जंगी स्वागत करण्यात आले असून लाखो समाज बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते.
कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात काल रात्री गणेश आगमन मिरवणूक उत्साहात पार पडली.
या मिरवणुकीत तब्बल 36 गणेश मंडळे सहभागी झाली होती.
मात्र, ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 36 पैकी 6 गणेश मंडळांवर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत... विशेष म्हणजे सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी अमित शहा कोल्हापुरात येत असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. 19 सप्टेंबरला कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर अमित शहा शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असतील... तर 20 सप्टेंबरला हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर अमित शहा शेतकरी जनसभेला संबोधित करणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात देशपातळीवर व राज्यात उत्साह आणि भक्तिमय वातावरण असते.बाप्पाच्या आगमनानंतर घर व अनेक मंडळे दहा दिवस बाप्पांची सेवा करीत असतात. यावेळी घरात अथवा मंदिरात दिवा, उदबत्ती,विद्युत रोषणाई आणि मोठ्या प्रमाणात सजावट केलेली असते.
आज सायंकाळी सहाच्या सुमारास वानवडी येथील एका इमारतीत सातव्या मजल्यावर आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी धाव घेत पाहणी केली असता घरातील देवघराशेजारी असलेले टेबल व त्यावरील पाटाने पेट घेतला होता.
गणेशोत्सव म्हटलं की आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध देखावे पाहायला मिळतात. मात्र कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदा साकारलेला ‘नीट परीक्षा पेपरफुटी’चा देखावा समाजातील एका गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या विषयाची प्रभावी मांडणी करण्यात आल्याने हा देखावा गणेशभक्तांसाठी विशेष लक्षवेधी ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा देखावा साकारण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अत्यंत विदारक झाली आहे.उभ पिक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत करपुन गेल,विहीरी कोरड्या पडल्या,जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून कोरड्या विहिरीत उतरत शेतकऱ्यांनी अनोख आंदोलन सुरू केलय.हातात कोरडा दुष्काळ जाहीर करा, एकरी साठ हजार रुपये मदत द्या अशा मागण्याचे फलक घेत शेतकरी हे कोरड्या विहिरीत उतरले आहेत.शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, गणपती दर्शनासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत चंद्रकांतदादा पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले.मानाच्या गणपतींच्या दर्शनानंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले.
मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादात आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केले. रोहित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना देसाई म्हणाले की, हैदराबाद गॅझेट मिळवून कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने मोठे काम केले आहे. या सर्व नोंदी मिळवून समितीकडे सोपवण्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे पार पाडले आहे, त्यामुळे शंभूराज देसाईंनी काय केले हे रोहित पवारांनी मनोज जरांगे पाटील यांनाच विचारावे.
लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. तर अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला, त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी व महिलांना तातडीने मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढत आक्रोश व्यक्त केला आहे.
येणारे पाच दिवस पाऊस नाही
राज्यात जून पासून आतापर्यंत 16 टक्के पावसाची तूट
राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे
यावर्षी परतीच्या मान्सूनमध्ये ही पाऊस नाही
१० ऑक्टोबरला मान्सून महाराष्ट्रातून परतण्याची शक्यता,परतीच्या मान्सूनसाठी हवामान अनुकूल दिसत नाहीत
येणाऱ्या पाच दिवस तरी पाऊस नाही,काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी असेल सर्व दूर नसेल
सध्या कोणतीही हवामान प्रणाली ऍक्टिव्ह नाही,मान्सूनचे वारे सुद्धा पीकमध्ये नाही,अरबी समुद्र कमी दाबाचे क्षेत्र नाही त्यामुळे.महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता कमी..
तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.मुसळधार पावसाची शक्यता नाही
मराठवाडा,विदर्भात पावसाची तूट जास्त.बऱ्याच ठिकाणी तो 50% पेक्षा जास्त तूट आहे,ऑगस्टमध्ये ही तूट 70 ते 80 टक्केपर्यंत गेली आहे.
2015 लाही असेच एल निनो होता. एल निनो मध्ये महाराष्ट्रात पाऊस कमी पडतो.
परतीचा मान्सून लगेचच पडेल किंवा सर्व दूर पडेल असं काही नसत्या त्या कंडीशन वरती अवलंबून असतं.
महाराष्ट्रात 16 टक्के पावसाची तूट मराठवाडा विदर्भात जास्त तूट आहे..
सांगली जिल्ह्यातील विटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ४२ लाख ८२ हजार रुपयांचे मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.. या प्रकरणी दत्तात्रय अंकुश पाखरे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून ९६५ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल आणि एक अल्टो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. विटा-तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयासमोर पोलिसांनी ही कारवाई केली.
* सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार राजेश पाडवी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची घेतली भेट
* नाशिकच्या ईदगाह मैदानावर मागील 29 दिवसांपासून सुरू आहे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन
* 28 सप्टेंबरला राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी नाशिकहून मुंबईला काढणार आहेत पायी उलगुलान मोर्चा
* आदिवासी विकास मंत्रांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे आंदोलन
* सेंट्रल किचन , गडचिरोली येथील आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थिनींच्या सर्प दअंशाने झालेल्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून१ कोटींची आर्थिक मदत करावी
* अनुदानित आश्रम शाळा शासकीय आश्रम शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करावी यासह विविध मागण्यासाठी सुरू आहे आंदोलन
* राजेश पाडवी यांच्याकडून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
गावातील मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमोर रायफलमधून हवेत गोळीबार करणे गावच्या माजी सरपंचाला महागात पडले आहे. परिते गावच्या विजयसिंह पाटील या माजी सरपंचावर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज अकोट तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले आहे.. अलनिनोचा प्रभाव हा संपूर्ण राज्यावर आहे. संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. राज्यात 50 दिवस पाऊस आलेला नाही, सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्ण उध्वस्त झालेला आहे. सोयाबीनचे दाणे भरले नाहीऐ, कापूस पीक पाण्याअभावी पीक वाढले नाही. त्यामुळं विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात असून अशा बिकट परिस्थितीत राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी आज शेतकरी संघटनेने हा रस्ता रोको आंदोलन केलय.
- ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल
- आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासह खासदार अमर काळे, माजी मंत्री रणजीत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघेसह ग्रामस्थांचा मोठा सहभाग
- गेल्या सहा दिवसापासून भगवान धुर्वे या शेतकऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही
- खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कुटुंबियांसह मदतीसाठी सहा दिवसापासून सुरू आहे आंदोलन
- वरिष्ठ अधिकारी आणि वनविभागाच्या पथकांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न
- मृतकाचे परिवारास एक कोटी रुपयांची मदत, कुटुंबातील सदस्याला नोकरी, वाघाचा बंदोबस्त, गावाचा पुनर्वसन देण्यासह विविध मागण्या करिताआंदोलन
- मात्र, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम
मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमधून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ताफा पाटोद्याच्या दिशेने रवाना झाला आहे ,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ताफ्यात सहभागी झाले आहेत.
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छावा संघटनेचा ताफा मुंबईकडे रवाना होतो आहे.
सकाळी अंतरवाली सराटीनंतर आता अंकुश नगर परिसरात चोरट्याकडून मोबाईल आणि सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न, संतप्त आंदोलक आणि नागरिकांकडून चोराला चोप
भीमाशंकर मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यावरणाचे संवर्धन यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले.मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.मराठा आरक्षणाच्या मागणीची सरकारने तातडीने दखल घ्यावी, तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केलीय.
अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर मत मांडले.
महावितरणने ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक नियमावली लागू केलीय... आता वीज बिल थकल्यास कर्मचाऱ्यांशिवाय थेट मुख्य सर्व्हरवरून तुमचा वीजपुरवठा स्वयंचलितपणे खंडित केला जाणार आहे
सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन दाखल झाले आहे. यापूर्वी सोनोग्राफीची सुविधा नसल्याने नागरिकांना वणी, दिंडोरी तसेच गुजरातमध्ये जावे लागत होते.
आरोग्य मंत्री नाशिक दौऱ्यावर आले असताना शिवसेनेतर्फे सोनोग्राफी मशीनची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. मशीन उपलब्ध झाल्याने आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून बीडच्या पाटोदा येथे त्यांचा पहिला मुक्काम होणार आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आणि पाठिंब्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव पाटोद्यात दाखल होत आहेत. सुमारे सात लाख समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून गावरान पद्धतीचा मेनू तयार करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात कांदा लागवडीला वेग आला आहे. कांद्याची रोपं लावताना महिलांनी पारंपरिक गीतातून वरुणराजाला साद घातली. चांगला पाऊस पडावा आणि पिकांना जीवदान मिळावे, अशी प्रार्थना महिलांनी केली. पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच कांदा लागवडीची लगबग शेतशिवारात सुरू आहे.
शरद पवारांचे निष्ठावंत आणि मावळचे शिल्पकार मदन बाफना यांनी सोडला प्राण. अल्पसंख्याक माध्यमातून पुढे येत काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा रुजवणारा लोकनेता हरपला. बाफना यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील मराठा कार्यकर्ते मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. यावर्षी मराठवाड्यात पाऊस कमी असल्याने अरबी समुद्रात गणेश विसर्जन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीचा अर्ज देण्यात आला आहे.
धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
यावर्षी मराठवाड्यात पाऊस नाही आम्हाला गणेश विसर्जन अरबी समुद्रात करायचा आहे, मराठा कार्यकर्त्यांकडून परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज
गेल्या वर्षी आम्हाला लालबागचा राजाच दर्शन झाल नाही त्यामुळे यावर्षी आम्हाला दर्शनाला जायचं आहे
सरकारकडून जरांगे पाटील यांची सातत्याने फसवणूक केली जात असल्याचा आरोप
राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध रुपी गणपती बाप्पा पाहायला मिळतात. यातच आता पुण्यातील सहकारनगर भागात काचेपासून तयार केलेली एक आकर्षक आणि कलात्मक गणपतीची मूर्ती आहे. या गणेश मंडळाचे नाव सुद्धा काचेचा गणपती मंडळ ट्रस्ट आहे जे ५३ वर्ष जुनं आहे.
दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
धमकीचे ईमेल आल्याची माहिती
बॉम्बशोधक पथक घटनस्थळी दाखल
परिसरात तपास सुरु
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
खामगाव तालुक्यातील अटाळी येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले’ आंदोलन सुरू केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या मागण्या व्हाव्यात यासाठी मनोज जरांगे आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबई पोलिसांनी नकार दिल्यांनतरही जरांगे आंदोलनावर ठाम
पुढे काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष
मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार..
डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत : डीवायएसपी सिद्धेश्वर धुमाळ
नवी मुंबई-
सानपाडा येथे हॅाटेलमध्ये सिलेंडर स्फोट
स्फोटात दोन कामगार जखमी
स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूच्या घरांच्या , कार्यालयातील काचा फुटल्या
१ किलो मीटरपर्यंत आवाजाची तीव्रता
अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल
अहिल्यानगर -
अहिल्यानगर शहरातील नगर कल्याण महामार्गावरील गणेशनगरमधील शंकर बबा मठ परिसरात तरस सदृश प्राणी.....
पहाटेच्या वेळी मानवी वस्तीत आढळून आला तरस सदृश्य प्राणी....
पाण्याच्या शोधात जंगली प्राण्यांचे पावले मानवी वस्तीकडे....
एका नागरिकाच्या मोबाईल मध्ये कैद झाला व्हिडिओ...
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे ...
पुणे
माजी मंत्री मदन बाफना यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार थोड्याच वेळात पोहचणार
पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी शरद पवार घेणार बाफना यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
महसूल, विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून स्वीकारली होती जबाबदारी
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा वडगाव मावळ येथील रहिवासी मदनजी हरकचंदजी बाफना ( वय वर्ष ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
नाशिक -
- नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट
- नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट
- नाव, छायाचित्र आणि पदाचा गैरवापर करून परदेशी क्रमांकावरून संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न
- या अकाउंटवर ‘Ayush Prasad’ असे नाव व जिल्हाधिकारी, नाशिक यांचे छायाचित्र वापरण्यात आले
- बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटसाठी थायलंड देशाच्या क्रमांकाचा वापर
पुणे -
पुण्यातील दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी २ तासांसाठी राहणार बंद
दुपारी १२ ते २ दरम्यान दिवे घाट वाहतुकीसाठी राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणार ब्लास्टिंग
या कामासाठी 12 ते दुपारी 14 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार
नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक विभागाचे आवाहन
नागपूर
- गणरायाच्या उत्साहात आगमनानंतर मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार.
- पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागपूर महापालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था.
- नागरिकांना जवळच्या विसर्जन केंद्राची माहिती क्यूआर कोड आणि संकेतस्थळाद्वारे मिळणार.
- क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घराजवळील विसर्जन केंद्राची माहिती उपलब्ध होणार.
- संबंधित केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपद्वारे दिशादर्शनाची सुविधाही उपलब्ध.
- गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी मनपाने १८ निर्माल्य रथ तयार केले.
- निर्माल्य रथांना मनपा मुख्यालयात महापौर नीता ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवली.
यवतमाळ -
यवतमाळमध्ये बिहारची मोबाईल लुटणारी टोळी जेरबंद
गर्दीचा फायदा घेत मारहाण करून मोबाईल बळजबरीने लुटणाऱ्या झारखंड-बिहार मधील टोळीचा यवतमाळच्या उमरखेड पोलिसांच्या डीबी पथकाने पर्दाफाश केला
या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहेत त्यांच्याकडून चोरीचे 10 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 6 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख तालीम शेख आयुब,शेख वसीम,अक्रम शेख आणि मकसूद आलम, इदवाह आलम अशी आरोपींची नावे आहेत.
पुणे -
पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण
ऋषीपंचनामी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पुणे शहर नव्हे तर राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी सहभाग घेतला होता.
३५ हजार पेक्षा अधिक महिलांनी यावेळी बाप्पाची आराधना करत सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.