Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: गणपती विसर्जनानंतर पावसाची बॅटिंग! राज्यात पुन्हा धो धो कोसळणार; कसं असेल हवामान? वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain News Weather Update: हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला वर्तवला आहे. गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather News: राज्यभरात गणपती विसर्जनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह प्रमुख शहरांमधील गणपती विसर्जन अद्याप सुरु आहे. अशातच गणरायाने निरोप घेतल्यानंतर आता राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला वर्तवला आहे. गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सप्टेंबरच्या शेवटपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज होण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. हवामान तज्ज्ञांच्या मते, दोन-चार दिवस दिल्लीतसह अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसत राहील. IMD ने आज दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT