Ambernath Accident: दैव बलवत्तर म्हणून बचावला! अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV

Ambernath Accident CCTV: अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर सोमवारी भीषण अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ambernath Accident: दैव बलवत्तर म्हणून बचावला! अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV
Ambernath Accident CCTVSaam Tv
Published On

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकनगरी बायपास रोडवर हा अपघात झाला. हा अपघात इकता भीषण होता की डंपरने दुचाकीला चिरडले पण या अपघातामध्ये दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या रस्त्यावर एका मागोमाग एक दोन डंपर डावीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार अचानक मागच्या डंपरच्या चाकाखाली आला. दुचाकीवरून डंबर गेला. दुचाकीस्वार बाजूला झाल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

Ambernath Accident: दैव बलवत्तर म्हणून बचावला! अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV
Raigad Accident: रायगडहून ऐरोलीला जाणाऱ्या बसचा अपघात; ५० फुट खोल दरीत कोसळली प्रवाशांनी भरलेली बस

दुचाकीवरून डंपरची दोन्ही चाकं गेल्यामुळे दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार यातून सुखरूप बचावला. ही सगळी घटना रस्त्याच्या कडेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. या घटनेनंतर डंपर मालकाने दुचाकीस्वाराला नुकसान भरपाई दिल्यामुळे पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पण या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा येत आहे.

Ambernath Accident: दैव बलवत्तर म्हणून बचावला! अंबरनाथमध्ये डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV
Latur Accident: लातूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com