Kas Pathar : रिमझिम पाऊस अन् गार वारा, २८० फुलांच्या प्रजाती; महाराष्ट्रातले व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पहिले का?

Travel Story : सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर जैवविविधतेने नटलेल्या या पाठराकडे पर्यटकांची पावलं वळायला लागतात. तुमच्या नेहमीच्या शहरी जीवनातील एकलकोंडे पणा कमी करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कासच्या छोट्या सहलीची योजना करू शकता.
Kaas Pathar
Kaas PatharKaasPathar
Published On

Tourism Update : पावसाळा संपत आला आणि गुलाबी थंडीला सुरुवात व्हायला लागली की अनेक पर्यटनप्रेमी या काळात डोंगरदऱ्यांवर फिरायला जाण्याचं नियोजन करत असतात. महाराष्ट्रातील अशी अनेक ठिकाणं आहेत जी या मोसमात बघण्यासारखी आहेत. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेलं सातारा जिल्ह्यातलं कास पठार हे असंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जे या दिवसांत निसर्गप्रेमींना फिरण्यासाठी पर्वणी ठरत असतं.

सातारा जिल्ह्यातील कास पठाराला निसर्गाने भरभरुन दान दिलं आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक कास पठारावर येत असतात. इथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांच्या प्रजातीसाठी हे पठार जगभर प्रसिद्ध आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर जैवविविधतेने नटलेल्या या पाठराकडे पर्यटकांची पावलं वळायला लागतात. तुमच्या नेहमीच्या शहरी जीवनातील एकलकोंडे पणा कमी करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कासच्या छोट्या सहलीची योजना करू शकता. जे यापूर्वी तिथे गेले आहेत त्यांचा अनुभव आहे की मुंबई किंवा पुण्याहून कासची रोड ट्रिप अविस्मरणीय आहे.

Kaas Pathar Story
Kaas Pathar StoryKaas Pathar

थोडंस कास पठार बद्दल..

सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावर 850 हून अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आढळतात आणि त्यापैकी 39 प्रजाती या फक्त कास कासपठारावरच आढळून येतात. २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश केला गेला आहे. हे पठार सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतात वसलेलं आहे. पश्चिम घाटातील सुमारे 140,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळचा भाग या पठाराने व्यापलेला आहे.

या कास पठाराच्या नावामागे दोन कथा सांगितल्या जातात. आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून आज कास पठार हे नाव पडले. अशी एक कथा आहे. तर दुसरी कथा अशी आहे की 'कासा'चा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि पठारावरील प्रमुख कास तलावामुळे त्याचे नाव कास पडले असं देखील म्हंटलं जातं. निसर्गातील आश्चर्यकारक बदल हे पठार इथे येणाऱ्या पर्यटकांना दाखवत असतं.

कास पठारावर जाण्यासाठी योग्य वेळ कोणती ?

या पठारावर फिरायला जाण्यासाठी वेळ महत्वाची ठरते. इथली फुलं बहरलेली असताना बघणे हा सुखावह क्षण असतो. हा फुलं बहरण्याचा हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरू होऊन ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहतो. या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतात. तुम्ही पिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात मंत्रमुग्ध करणारे बदल पाहू शकता. कारण फुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतात. तुमच्या सहलीचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज आणि फुले बहरण्याचा मुख्य हंगाम लक्षात घेणे गरजेचे आहे. बऱ्याच दुर्मिळ फुलांच्या प्रजाती या कालावधीत बघण्यास मिळतात.

या परिसरातील बघण्यासारखी ठिकाणं ..

कास पठारला भेट देणं प्रवासादरम्यान प्राधान्यचं असलं तरी या परिसरात बघण्यासारखी इतरही उल्लेखनीय पर्यटन स्थळं आहेत. यात कुमुदिनी तलाव, ठोसेघर धबधबा, ऐकीव धबधबा, वज्राई भांबवली धबधबा, यवतेश्वर मंदिर, सज्जनगड किल्ला आणि कास तलाव ही ठिकाणं देखील इथल्या पर्यटनाच्या वैभवात भर घालतात. त्यामुळं कास पठार फिरायला जातांना या स्थळांनासुद्धा एकदा नक्की भेट द्या.

Kaas Pathar
Ganesh Visarjan 2024 LIVE : दगडुशेठ गणपतीच विसर्जन, पर्यावरण पूरक पद्धतीने दिला बाप्पाला निरोप

कास पठारला कसं जाणार ?

१) रस्त्याने ..

महाराष्ट्रात कास हे साताऱ्यापासून 30 किमी आणि महाबळेश्वरपासून 25 किमी अंतरावर आहे. पुणे आणि कासपठार मधील अंतर हे 136 किमी आहे, जे NH4 द्वारे प्रवास करून 2.5 ते 3.5 तासांत पूर्ण होते. मुंबईपासून हे अंतर 278 किमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि नंतर NH4 वापरून कारने कास पठारला जाण्यासाठी सुमारे 5 तास लागतात.

मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून, तुम्हाला NH4 वर साताऱ्यापर्यंत गाडी चालवत यावे लागेल. नंतर साताऱ्यापासून पुढे आणखी 22 किमी पुढे मार्ग बदलून जावे लागेल. हा रस्ता प्रवास स्मरणात कायम स्वरूपी स्मरणात राहील. याचे एकमेव कारण म्हणजे कासपठार व्हॅलीची शेवटची चढाई. हे एक सुंदर दृश्य असून भारतातील सर्वात नयनरम्य रोड ट्रिपपैकी एक आहे. जर तुम्ही बसने जाण्याचे ठरवले असेल तर सर्व प्रकारच्या बजेटनुसार मुंबई ते सातारा रात्रभर असंख्य बस मिळतात.

2) रेल्वेने ..

तुम्ही मुंबई येथून साताऱ्याला जाण्यासाठी ''कोयना एक्सप्रेस'' पकडू शकता. तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून कासपठारपर्यंत नेण्यासाठी स्थानिक ऑटो-रिक्षा भाड्याने उपलब्ध आहेत किंवा तुम्ही रेल्वे स्टेशनपासून बसने सातारा S.T डेपोला येऊन बस पकडू शकता.

3) विमानाने ..

पुण्यासाठी उड्डाण करून कासला लवकरात लवकर पोहोचता येईल. नंतर रस्त्यावरील NH4 मार्गाने कासपठारावर पोहचता येते.

Kaas Pathar
Naturopathy College : मोठी बातमी! राज्यात सुरु होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, जुनाट आजारांचा होणार नायनाट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com