Naturopathy College : मोठी बातमी! राज्यात सुरु होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, जुनाट आजारांचा होणार नायनाट

First Naturopathy College approved 60 bed hospital Will started : राज्यात नॅचरोपॅथी कॉलेजला मान्यता देण्यात आलीय. कोल्हापुर जिल्ह्यात हे कॉलेज सुरू होणार आहे.
 नॅचरोपॅथी कॉलेज
Naturopathy CollegeSaam Tv
Published On

मुंबई : अलीकडे आजारांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. नागरिक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. अलीकडे निसर्गोपचार पद्धतीच्या उपचारांकडे कल वाढलेला आहे. यासाठी खासगी व्यावसायिकांची मागणी देखील वाढलीय. परंतु या पद्धतीचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामधील आयुष संचालनालयाअंतर्गत यंदापासून 'बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्सेस' या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आलीय.

या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यात यावर्षी नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिलं कॉलेज सुरू होणार आहे. बारावी विज्ञान शाखेतील गुणांच्या आधारावर या अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती (First Naturopathy College) मिळतेय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेची या विषयाचा पदवी अभ्यासक्रम बनविण्यासाठी मदत घेतली गेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे अभ्यासक्रम अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे.

अभ्यासक्रमात काय आहे?

बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्सेस हा अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा असल्याची माहिती मिळतेय. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप अनिवार्य आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी देण्यात येणार (Kolhapur News) आहे. शासनाने कॉलेजच्या परवानगीसोबत ६० बेड्सच्या नॅचरोपॅथी रुग्णालयाला देखील मंजुरी दिलीय. ‘शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय’ असं या कॉलेजचं नामकरण करण्यात आलंय.

 नॅचरोपॅथी कॉलेज
Bhandara Civil Hospital : गळतीने भंडारा जिल्हा रुग्णालयात पाणी साचले; रुग्ण नातेवाईकांनी अख्खी रात्र काढली जागून

नॅचरोपॅथीचा फायदा काय?

नॅचरोपॅथी उपचार पद्धतीत फळे, ध्वनी,उष्णता, वनस्पती, पाणी आणि सूर्यप्रकाश या नैसर्गिक साधनांचा वापर केला (What is Naturopathy) जातो. या पद्धतीमध्ये ॲलोपॅथी किंवा शस्त्रक्रियांचा अतर्भाव करण्यात येत नाही. अनेक खासगी संस्था या उपचार पद्धतीत मागील काही वर्षांपासून काम करत आहेत. जुने आजार दूर करण्यासाठी या उपचार पद्धतीची जास्त करून मदत घेण्यात येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. यामध्ये नैसर्गिक घटक जुन्या आजाराच्या मुळाशी जाऊन, तो आजार बरा असतात. या पद्धतीचे जास्त दुष्परिणाम नाहीत.

पहिल्या शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालयासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत (Naturopathy College In Maharashtra) आहे. मुळात या पद्धतीचा अभ्यासक्रम केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये यापूर्वीच सुरू झालाय. आपल्याकडे हा अभ्यासक्रम यंदा सुरू होत आहे. येत्या महिनाभरातच पहिली बॅच सुरू होण्याची शक्यता आहे.

 नॅचरोपॅथी कॉलेज
Ghati Hospital : 'घाटी'त घोटाळा! हॉस्पिटलचा ऑन पेपर कर्मचारी वेगळा, ऑन ड्युटी तिसराच!, अजब कारनामा उघड!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com