Bhandara Civil Hospital : गळतीने भंडारा जिल्हा रुग्णालयात पाणी साचले; रुग्ण नातेवाईकांनी अख्खी रात्र काढली जागून

Bhandara News : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सर्व सामान्य नागरिकांचा आधार आहे. भंडारा, गोंदिया तसेच जवळ असलेल्या मध्यप्रदेश येथिल रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. दररोज १० हजाराची ओपिडी
Bhandara Civil Hospital
Bhandara Civil HospitalSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडाऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली रुग्णालयात पाणीच पाणी साचले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संपुर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकामाचा फटका नागरिकांना बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Bhandara Civil Hospital
Bhandara Heavy Rain : भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, राज्य मार्गावरही साचले पावसाचे पाणी

भंडारा (Bhandara) जिल्हा सामान्य रुग्णालय सर्व सामान्य नागरिकांचा आधार आहे. भंडारा, गोंदिया तसेच जवळ असलेल्या मध्यप्रदेश येथिल रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. दररोज १० हजाराची ओपिडी या रुग्णालयात आहे. २०१८ मध्ये नवीन इमारत बांधकाम करण्यात आली. कोरोना काळात या इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले होते. तर आता जनरल, आयसीयू वार्ड याच इमारतीत आहेत. जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस बरसला याच पावसामुळे रुग्णालयाची (Hospital) नवनिर्मित इमारत गळू लागली आहे. रुग्णाच्या बेड वर तसेच वरांड्यात पाणी साचले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी अख्खी रात्र जागून काढली असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

Bhandara Civil Hospital
Yavatmal News : यवतमाळ शहरात बनावट खाद्यतेलाची विक्री; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाड टाकत कारवाई

कोट्यवधी रूपये खर्च करून नवीन इमारत बांधकाम करण्यात आली. पण बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरची इमारत नवनिर्मित असुन देखिल गळती लागली आहे. ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट बांधकाम केलं अशा कंत्राटदारावर कारवाही करायला पाहिजे. पण जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन कारवाईच्या नावाखाली सारवासारव करित आहे. स्थानीक आमदार भोंडेकर यांनी या रूग्णालय गळती प्रकरणात चौकशी केली जाईल व दोषी कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड केलं जाणार असल्याचे सांगितले आहे. यात खरोखर चौकशी केली जाते, कि हे प्रकरण देखिल दाबले जाईल; हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com