Ganesh Visarjan 2024 LIVE : दगडुशेठ गणपतीच विसर्जन, पर्यावरण पूरक पद्धतीने दिला बाप्पाला निरोप

Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भावपूर्ण निरोप दिला जाईल. या महामहोत्सावाचा समारोप सोहळ्याचा थोडक्यात आढावा
Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi :
Mumbai Ganesh VisarjanSaam Tv
Published On

Pune Ganesh festival : दगडुशेठ गणपतीच विसर्जन, पर्यावरण पूरक पद्धतीने दिला बाप्पाला निरोप

पुणेकरांचं अतुट श्रद्धास्थान असलेलं दगडुशेठ गणपतीचं विसर्जन 8 वाजून 50 मिनिटांनी करण्यात आलं आहे. डेक्कन येथील पांचाळेश्वर विसर्जन घाटावर दगडूशेठ गणपतीचं विसर्जन अगदी पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यात आलं.

Pune Ganesh festival :  पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

संपन्न पारंपारिक पद्धतीने मानाच्या पाच ही गणपतींना जड अंतःकरणाने निरोप

पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात मानाचे गणपती विसर्जित

Amravati Ganeshotsav : आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं बाप्पाचं विसर्जन

आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं आहे.अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथील तलावात राणा दाम्पत्यानी बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करत केले विसर्जन आणि निरोप दिला. यावेळी विसर्जनासाठी आलेल्या अनेक घरगुती बाप्पाचे राणा दाम्पत्यानी दर्शन घेतले.

 kolhapur ganeshotsav : 'लेझर शो'वर बंदी असतानाही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर

लेझर शोवर बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यात आला आहे. लेझर शोमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बंदी घातली होती. पण पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत.

Pune Ganeshotsav 2024  :  पुण्यातील मानाच्या ४ गणपती बाप्पांचे विसर्जन

आत्तापर्यंत मानाच्या ४ गणपती बाप्पांचे विसर्जन

काही वेळापूर्वी मानाचा पाचवा आणि शेवटचा गणपती केसरीवाडा अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती: ४ वाजून ३५ मिनिट

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी: ५ वाजून १० मिनिट

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम: ६ वाजून ४४ मिनिट

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ: ७ वाजून १५ मिनिट

Chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद मैदानावर चिमुकल्यासह नागरिकांची मोठी गर्दी

गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणरायाच्या आनंदोत्सवाची सांगता आज होत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील विविध भागातून आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर महापालिका प्रशासनातर्फे गणरायाच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी घरातील लहान चिमुकल्याणसह नागरिकही आपल्या लाडक्या बाप्पांना हातात घेऊन विसर्जनाच्या ठिकाणी दाखल होत आहे.

Pune Ganeshotsav 2024 : मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती अलका चौकात 

- मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॅाकीज चौकात दाखल

- ⁠मिरवणुकाच्या पुढील चित्र रथावर बाळ गंगाधर टीळक, लाला लजपतराय आणि बकीमचंद्र पाल यांचा जिवंत देखावा

Pune Ganpati Fire : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली आहे.

फटाक्यामुळे गणपतीच्या रथाला लागली आग

रथाला आग लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने विझविली.

Pune Ganeshotsav : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती अलका चौकात

- मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुक अलका चौकात दाखल

- ⁠अलका चौकातुन विर्सजनासाठी मार्गस्थ होणार

lalbaugcha raja 2024 : लालबागच्या राजाची झलक पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO

लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला आहे. लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंग पुष्पव्रुष्टी मंडळातर्फे पुष्पव्रुष्टी करण्यात आली. राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मिरवणुकीत तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

Pune ganeshotsav  : पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीच 5 वाजून 5 मिनिटांनी विसर्जन झालं आहे. डेक्कन येथील नदी पात्रालगत पर्यावरण पूरक पद्धतीने या वर्षी देखील तांबडी जोगेश्वरी गणपतीच अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं आहे.

Nashik News : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव

नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव

- शिवतांडव नृत्याने वेधले गणेश भक्तांचे लक्ष

- अघोरी नृत्याने गजबजला नाशिकचा विसर्जन मिरवणूक महामार्ग

- हरियाणाचे कलाकारांनी केले नृत्य

- विसर्जन मिरवणुकीत शंकरासह महाबली हनुमान यांचे अनोखे नृत्य

- या अनोख्या नृत्याला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

- शिवसेना युवक मित्र मंडळाचा अनोखा नृत्य प्रयोग

- दरवर्षी वेगवेगळ्या आकर्षक नृत्याची मेजवानीचा शिवसेना युवक मित्र मंडळाचा असतो उपक्रम

Pune News : पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन घाटावर

पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं डेक्कन येथील विसर्जन घाटावर आगमन झालं आहे.

अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकर तांबडी जोगेश्वरी गणपतीला निरोप देत आहेत .

गणपती बाप्पा मोरया, मोरया असा जय घोष देत पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

Tambadi Jogeshwari : तांबडी जोगेश्वरी गणपती अलका चौकात दाखल

तांबडी जोगेश्वरी गणपती अलका चौकात दाखल

पालखीमधून मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक

दुपारी ४.१८ मिनिटांनी अलका चौकात दाखल

अलका चौकातून तांबडी जोगेश्वरी विसर्जन घाटावर जाणार

kasba ganpati : पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन

पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीच आगमन विसर्जन घाटावर झाला आहे.

अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकर कसबा गणपतीला निरोप देत आहेत.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जय घोष देत पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

Pune Ganesh Festival : पुण्यातील कसबा गणपती अलका चौकात दाखल

कसबा गणपती अलका चौकात दाखल

- कसबा गणपती ३.३५ वाजता अलका टॅाकीज चौकात दाखल झालाय.

- ⁠अलका टॅाकीज चौकातून थेट विसर्जन घाटावर विसर्जनासाठी रवाना होणार.

Ganeshotsav 2024 : परेलमधील सार्वजनिक गणपती गिरगावकडे मार्गस्थ

१० दिवसांच्या पूजेनंतर गणपतीचं वाजतगाजत विसर्जन मिरवणुका निघत आहेत. सार्वजनिक गणपतीच्या वेगवेगळ्या मंडळाचे गणपती परेलवरुन गिरगावकडे मार्गस्थ होत आहे. हळूहळू या गणपतींचं विसर्जन केलं जाईल

Chintamani Ganpati: चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरूवात

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. आरती झाल्यानंतर बाप्पाला विसर्जन मिरवणुकीसाठी मंडपातून बाहेर काढण्यात आले आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्यासंख्यने गणेशभक्त आले आहेत.

Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi :

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन

बाप्पाला निरोप देताना सुशीलकुमार शिंदेचे नातू शिखर पहारिया देखील उपस्थित

यंदाच्या वर्षी शिंदे परिवाराने सोलापुरात गणेशोत्सव साजरा केला

दहा दिवस सुशीलकुमार शिंदेच्या गणेशोत्सवसाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील हजेरी लावली होती

आज प्रणिती शिंदे आणि शिखर पहारिया यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आला

यावेळी शिंदे कुटुंबीयसह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते

अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात

Ganesh Visarjan 2024 LIVE : अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीचं जयहिंद चौकात पुजन करण्यात आलंय. या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालीये. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होतेय. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचं हे 130 वं वर्ष आहेय. अकोल्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाला उत्साहात सुरुवात झालीय. महापालिकेने शहरातील मोर्णा नदीवरील गणेश घाटावर कुंडांची निर्मिती केलीये. या गणेश घाटावर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलीय. अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

Ganesh Visarjan 2024 LIVE :  पोलिस ठाण्यातील बाप्पांचे आदर्शवत विसर्जन

आज गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. ड्युटीवर तैनात होण्याआधी मुंबई पोलिसांनी पोलिस ठाण्यातील बाप्पांचे आदर्शवत विसर्जन केले. मुलुंड पोलीस ठाण्यातील बाप्पाला पोलिसांनी वारकरी संप्रदायची वेशभूषा करीत , भजन करीत , टाळ मृदुंगाचा तालावर निरोप दिला. मुलुंड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते.

Ganesh Visarjan 2024 LIVE :  कोल्हापुरातील इराणी खणीत गणेश मूर्तींचे विसर्जन

कोल्हापुरात सकाळी 9 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून कोल्हापुरातील इराणी खण परिसरात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. पंचगंगा नदीत मोठ्या मूर्ती विसर्जन करून नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी कोल्हापुरातील इराणी खणीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे

Ganesh Visarjan 2024 LIVE :  सर्वांना सुख, शांती मिळू दे -उपमुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणरायाच्या चरणी घातले. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...!' असा घोष करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

पवार यांनी महात्मा फुले मंडई परिसरात पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतीचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर या मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीस सुरु करण्यात आली.

Ganesh Visarjan 2024 LIVE : मनमाडचे आराध्य दैवत श्री गणेशाची वाजत गाजत पालखीतून विसर्जन मिरवणूक 

Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : मनमाड शहरातील पुरातन वेशातील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री निलमणी गणेशा ची मंदिरात गणेशोत्सव काळात पार्थिव मूर्तीची स्थापना करण्यात आली होती,दहा दिवसात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले,आज मंदिरातून पारंपरिक पद्धतीने संपूर्ण मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढत ढोल-ताशा,गोंधळी,रांगोळ्या यांच्या उपस्थितीत पालखीतून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.

Ganesh Visarjan 2024 LIVE : अलका टॉकीज चौकात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स

Ganesh Visarjan 2024 LIVE :  अलका टॉकीज चौकात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स

संपूर्ण चौकात गणेश विसर्जनाचे फ्लेक्स

मात्र उद्धव ठाकरेंच्या फ्लेक्स वरचा मजकूर वेगळा

अलका टॉकीज चौकात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आमदार, खासदार यांच्या तर्फे विविध फ्लेक्स लावण्यात आले आहेत

"गुलामीपेक्षा स्वतःचा नमस्कार चांगला" हा उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स ठरतोय आकर्षण

Ganesh Visarjan 2024 LIVE : राज्यातील सर्वात मोठी विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक...

Ganesh Visarjan 2024 Live Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या निगण्याची गेल्या 41 वर्षांपासून परंपरा आजही कायम आहे.. यानुसार आज मिरवणुकीत या विद्यालयाचे पहिली ते बारावी इयत्तेचे जवळपास 6 हजार विद्यार्थी सहभागी झाले असून प्रत्येक वर्गाचा सामाजिक संदेश देणारा वेगवेगळा देखावा या मिरवणुकीत साकारले गेले आहेत .. गेल्या 42 वर्षाची परंपरा असलेली अगदी शिस्तबध्द असलेली ही मिरवणूक राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची इतक्या मोठ्या संख्येने असणारी राज्यातील एकमेव विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक आहे... संपूर्ण चिखली शहरातून ही मिरवणूक निघाली असून या मिरवणुकीसाठी कुठलाही पोलीस बंदोबस्त नाहीये .. या मिरवणुकीला आमदार श्वेता महाले यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केलाय.

Pune Manache Ganpati News

मानाचे पाच ही गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू

कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

मानाचे पाहिले ३ गणपती लक्ष्मी रोड ने पुढे मार्गस्थ

Ganesh Visarjan 2024: ढोल- ताशाच्या गजरात मुंबईकर बाप्पाच्या विसर्जनास मार्गस्थ! | Marathi News

Mumbai Ganesh Visarjan 2024 LIVE

सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी लालबागमध्ये दाखल

गर्दीचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सहपोलीस आयुक्त लालबागमध्ये

Ganesh Visarjan 2024 LIVE : चिमुकल्या मुलींनी लाडक्या बाप्पाला खाऊ, जेवन दिलं 

पुण्यनगरीत लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या मुलींने बाप्पाच्या आठवणीने साम टिव्हिच्या कँमेरात बोलुन दाखवल्यात

आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा आज परतीच्या प्रवासाला निघालेत बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झालेत मुळा मुठा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप दिला जातोय

याचाच आढावा घेत चिमुकलीच्या मुखातुन बाप्पाच्या आठवनीला कंठ फुटला याबाबत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी बातचीत केलीय

Ganesh Visarjan 2024 LIVE :  घरगुती गणपतीलाही मिरवणुक काढत, फटाक्यांची आतिषबाजी करत निरोप

घरगुती गणपतीलाही मिरवणुक काढत, फटाक्यांची आतिषबाजी करत निरोप

- ⁠कुमठेकर रस्त्यावर डॅाक्टर मिलिंद संपगावकर यांच्या घरगुती गणपतीची मिरवणुकीती चर्चा

- ⁠आकर्षक मुषकावर स्वार होऊन घरगुती बाप्पा विसर्जनासाठी रवाना

Ganesh Visarjan 2024 LIVE : कोल्हापूर : बंदोबस्तावरील पोलिसांचा कोल्हापुरात वाढदिवस साजरा

Ganesh Visarjan 2024 LIVE :   गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसांचा कोल्हापुरात आज वाढदिवस साजरा करण्यात आला. गेले पंधरा दिवस पोलीस गणेश उत्सवानिमित्त खडा पहारा देत होते. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण होते. मात्र आज सकाळी मिरजकर तिकटी परिसरात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस आहे, हे समजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. आज वाढदिवसानिमित्त घरी जायला मिळेल की नाही याची शंका असताना थेट बंदोबस्तावर वाढदिवस साजरा करत इतर सहकार्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्याने हे कर्मचारी भारावून गेले.

Ganesh Visarjan 2024 LIVE :  सोलापुरात भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जनाला सुरुवात

सोलापुरात भक्तीपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाला झाली सुरुवात

10 दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज सोलापुरातील नागरिक देतायत बाप्पाला निरोप

सोलापूर महापालिकेतर्फे 14 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था तर 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

शहरात 1143 सार्वजनिक मंडळानी यंदा गणेश प्रतिष्ठापना केली होती

संध्याकाळी 4 नंतर या सर्वजनिक मंडळाच्या मिरवणूकीला सुरुवात होईल

191 मंडळ या मिरवणूकामध्ये सहभागी होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त या वेळी तैनात आहे.

Ganesh Visarjan 2024 LIVE : नाशिकमध्ये गणरायाला निरोप

Ganesh Visarjan 2024 LIVE : नाशिक दहा दिवस गणरायाचे मनोभावे पूजा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून येतोय अश्रू साक्ष नयनांनी गणरायाला निरोप देण्यात येतोय नाशिकच्या रामकुंड परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गणेश मूर्ती विसर्जना सुरुवात केली आहे या ठिकाणी काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मूर्तिदान करण्याचे देखील आवाहन करण्यात आलेला आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक देखील सज्ज झाल्याचा बघायला मिळतोय.

Ganesh Visarjan 2024 LIVE : चंद्रपुरात बाप्पाच्या मिरवणुकीला प्रारंभ

चंद्रपुरात बाप्पाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. पहिल्यांदाच सकाळी अकरा वाजता बाप्पाच्या मूर्ती मंडपातून बाहेर काढण्यात आल्या. विसर्जनाला फार उशीर होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली. विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी पोलिस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सुमारे नौशे पोलिस कर्मचारी आणि एक हजार होमगार्ड यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

Ganesh Visarjan 2024 LIVE : लालबागचा राजा कार्यकर्त्यांची दादागिरी, महिला पोलिसांना शिवीगाळ

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : लालबागचा राजा कार्यकर्त्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी केली. स्टेजवर चढण्यासाठी कार्यकर्त्यांनी दादागिरी केली. महिला पोलिसांना शिवीगाळ केल्याचं समोर आलेय.

Pune Traffic News: वाहतुकीसंदर्भात पुणे पोलिसांकडून व्हिडीओ शेअर! | Marathi News

Ganesh Visarjan 2024 LIVE : महानगरपालिकेच्या गणपतीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरवात

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : आज अनंत चतुर्थी म्हणजेच गणरायाला निरोप देण्याचा दिवस, , जळगाव शहरातील मनाचा असलेला महानगरपालिकेच्या गणपतीची ढोलताशयच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सुरुवात झाली आहे यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे , पोलीस अधीक्षक, आयूकत, तसेच पोलीस अधिकारी व महापालिका कर्मचारी यांची उपस्थिती होती, प्रथम मनाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यांनतर गणेश मिरवणुकीला सुरवात झाली,यावेळी मिरवणुकीत ढोल ताश्यांच्या गजरात सर्व पदाधिकारी व कर्मचाऱयांनी ठेका धरला.

Ganesh Visarjan 2024 LIVE : परळच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक लालबाग मार्केटमधून जात आहे

Ganesh Visarjan 2024 LIVE
Ganesh Visarjan 2024 LIVEGanesh Visarjan 2024 LIVE

Nagpur Ganesh Visarjan News: 'नागपूरच्या राजा'ची विसर्जन मिरवणूक | Marathi News

Ganesh Visarjan 2024: अहमदनगर मध्ये गणेश विसर्जनला सुरुवात

Summary

Ganesh Visarjan 2024: अहमदनगर मध्ये गणेश विसर्जनला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आली आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नेप्ती नाका परिसरात विसर्जन कुंड तयार करण्यात आला आहे निर्माल्य वाहून नेण्यासाठी वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आलीय.शहरातील 12 मानाच्या गणपतीची विसर्जन याच कुंडात होणार असून महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंडाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील विसर्जन कुंड परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे असून बारा मानाचे गणपती तसेच घरगुती गणपतीचे विसर्जन याच कुंडात केले जाणार आहे.

Ganesh Visarjan 2024: पुण्यातील टिळक चौकात शंखनाद करत गणेश भक्तांचा उत्साह! | Marathi News

Ganesh Visarjan 2024 LIVE : मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ,आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच आवाहन

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असुन घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांच आज विसर्जन होईल साता-यातील जनतेला मनापासुन शुभेच्छा देतो मिरवणुक शांततेत आणि भक्ती भावाच्या वातावरणात पार पाडावी आणि मिरवणुक वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला पोलिसांना सर्व मंडळांनी आणि सातारकरांनी सहकार्य करावं आणि नियमांच पालन करावं असं आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय.

Ganesh Visarjan 2024 LIVE :  आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अमरावतीमध्ये भाविकांची गर्दी

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आज श्री गणेशांला निरोप दिल्या जात आहे. श्री गणेशाच्या विसर्जनासाठी अमरावती शहरात प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. अमरावतीच्या छत्री तलावात कृत्रिम तयार करण्यात आले असून ,अमरावती शहरात तब्बल पन्नास हजार मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी 21 कृत्रिम टॅंक व 3 जलाशयात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी 1400 पोलिसांचा बंदोबस्त देखील पोलिस विभागाकडून लावण्यात आलेला आहे.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE : वाड्या गणपतीची पालखी मार्गस्थ

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : पुण्यातील पाचवा मानाचा गणपती असलेल्या केसरी वाड्यातील वाड्या गणपतीची पालखी विठ्ठु माऊलींच्या रथातुन केसरी वाड्यातुन मार्गस्थ झालीय

Ganesh Visarjan 2024 LIVE : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : - मनपाकडून 56 ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी

- सकाळी 11 वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणूक

- 21 सार्वजनिक मंडळांचा मिरवणुकीत असणार सहभाग

- मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

- 50 ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून मिरवणुकी वर राहणार निगराणी

- पंधरा तास चालणार विसर्जन मिरवणूक

- नियम भंग केल्यास कठोर कारवाई चा पोलीस आयुक्तांचा इशारा

- तर मूर्ती संकलन करण्यासाठी "देव द्या देवपण घ्या" ही संकल्पना विद्यार्थी कृती समितीच्या वतीने राबवली जातेय.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : मानाचा पहिला गणपती आणि मानाचा दुसरा गणपती टिळक चौकात दाखल

ग्रामदैवत कसबा गणपती मानाचा पहिला गणपती

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती

दोन्ही गणपती टिळक चौकात दाखल

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ganesh Visarjan 2024 LIVE : घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : पुण्यात घरगुती गणपतींना ही आज भावपुर्ण निरोप दिला जात आहे. गणेश भक्त महापालिकेनं तयार केलेल्या विसर्जन हौदामध्ये लाडक्या बाप्पाचं विसर्जन करत आहेत. महारालिकेनं गणेश मुर्तीचं विसर्जन यासाठी हौद तयार केले आहेत.

Lalbaugcha Raja News: लालबागच्या राजाला भेट म्हणून साकारली आकर्षक अशी रांगोळी! | Marathi News

Ganesh Visarjan 2024 LIVE : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रबोधनात्मक फलक

Maharashtra Ganpati Celebration Updates in Marathi : कोल्हापूर शहरात पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी कोल्हापूरकर या मिरवणुकीमध्ये प्रबोधनात्मक, लक्षवेधी फलक घेऊन उतरतात. यंदाही काही महिला मंडळ या मिरवणुकीत लक्ष वेधणारे फलक घेऊन उतरले आहेत.

Anant Chaturdashi: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा जोरदार उत्साह!

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE

Maharashtra Ganesh Visarjan Updates in Marathi : पुण्याचा चौथा मानाचा गणपती जग्गनाथ पुरीच्या भागीरथाची प्रतिकृती आणि श्रींना चांदीच्या दागिन्यांची सजावट...!

पुण्याचा तुळगी बागेचा चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणुक जग्गनाथ पुरीची प्रतिकृती असलेल्या भागीरथातुन निघाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलीय यावेळी रांगोळी फुलांच्या पायघड्या सोबतच भागीरथाची आकर्षक सजावट करण्यात आली असुन श्रींची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यात आलीय

Ganesh Visarjan 2024 LIVE :  कोल्हापूरमध्ये  गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra Ganesh Visarjan Updates in Marathi : कोल्हापुरात पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. कोल्हापुरातील मानाचा श्री तुकाराम माळी तरुण मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने या मिरवणुकीला सुरुवात होते. तुकाराम माळी तरुण मंडळाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीने शाडू मध्ये बनवण्यात आलेल्या गणेश मूर्तीच पालखीमध्ये विराजमान होऊन विसर्जन केलं जातं. मिरवणुकीच्या सुरुवातीला कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आलं. पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

Lalbaugcha Raja Visarjan LIVE Updates: लालबागचा राजा मंडळाच्या गेटवर प्रचंड गर्दी

Mumbai Ganesh Visarjan:  लालबागचा राजा मंडळाच्या मेन गेटवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी झाली. मंडळाला गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे पोलिसांना पुढे यावे लागले व गर्दी बाजूला करावी लागली.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE :  पुण्याचा तिसरा मानाचा गणपती राजा गुरुजी तालीम

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यनगरीतुन तिसरा मानाचा गणपती असलेल्या पुण्याचा राजा गुरुजी तालीम गणपतीला सुर्यरथातून निरोप दिला जाणार आहे.

पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात आला असुन रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार असुन यामध्ये गुलालाची उधळण मुख्य आकर्षण रहाणार आहे.

Kolhaour Ganesh Visarjan 2024 : कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळ मिरवणूक केव्हा सुरू होणार?

कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. पारंपारिक पद्धतीने आणि ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. प्रथम मानाचा गणपती असणाऱ्या श्री तुकाराम तालीम मंडळाच्या या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघणार आहे. साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास या मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतरच कोल्हापुरातील सर्व मिरवणुका या सुरू होतात. या मिरवणुकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होतात.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE :  पुढच्या वर्षी लवकर या... कसबा गणपती थोड्याच वेळात मिरवणुकीसाठी निघेल 

Pune Ganesh Visarjan Live Updates in Marathi : पुण्यात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ९ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीसाठी निघेल. त्याअगोदर कसबा गणपती समोर तयारी सुरू करण्यात आली आहे.रांगोळी काढली जात आहे.अनेक भाविक दर्शन घेत आहेत. काही वेळात कसबा गणपती मुख्य मंदिरातून मिरवणुकीसाठी टिळक चौकामध्ये जाईल.

Mumbai Ganesh Visarjan: बाप्पाची विसर्जन मिरवणूक 'या' पुलांवर थांबवू नका, अनेक मार्गांवर पार्किंगला मनाई; वाचा सविस्तर

Lalbaugcha Raja Visarjan LIVE Updates

Ganesh Visarjan 2024 LIVE :  यवतमाळच्या राजाला निरोप, आज 983 मंडळाकडून गणेश विसर्जन

Maharashtra Ganesh Visarjan Updates in Marathi : ९ दिवसाच्या मुक्कामानंतर बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून यवतमाळच्या राजाला निरोप देण्यात आला. शहरातील मेन लाईन परिसरातून ढोल ताशांचा गजरात, गुलाल उधळत विघ्नहर्ताची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जन मिरवणुकी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील 983 मंडळाकडून आज बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. आजपासून जिल्ह्यात तब्बल पाच दिवस विसर्जन होणार आहे.

Ganesh Visarjan 2024 LIVE : छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 19 रस्ते 24 तास बंद; मिरवणुकीत लेझर शोवर बंदी

Maharashtra Ganesh Visarjan Updates in Marathi : छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सिद्धार्थ उद्यान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होणार आहे.तसेच गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याची सांगता देखील आज होणार आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा निरोप देण्यासाठी सर्वच गणेश भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सज्ज झाले असून, 206 अधिकाऱ्यांसह 3 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. तर, शहरातील गणपती बाप्पांच्या मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल देखील करण्यात आले असून 19 रस्ते आज सकाळपासून 24 तासासाठी बंद राहणार.याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.

Ganesh Visarjan 2024 LIVE : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांसह नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

Maharashtra Ganesh Visarjan Updates in Marathi : मागील दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलीय. भक्तांना कुठेही असुविधा होऊ नये म्हणून महानगरपालिकेने गणपती विसर्जनाची तयारी केलीय. नांदेड शहरात तीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून 26 मूर्ती संकलन केंद्राची स्थापना करण्यात आलीय. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 2 हजार 900 पोलीस अधिकार आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार दगडूशेठ मंदिरात पोहचले

Pune Ganesh Visarjan Live Updates in Marathi : उपमुख्यमंत्री अजित पवार दगडूशेठ मंदिरात पोहचले

अजित पवारांच्या हस्ते होणार बाप्पाची पूजा आणि आरती

पालकमंत्री मानाच्या गणपतींची आरती आणि पूजा सुद्धा करणार

अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार, रूपाली चाकणकर सुद्धा उपस्थीत

ganesh galli cha raja 2024 : ८ वाजता मुंबईच्या राजाची आरती सुरू होईल

Mumbai Ganesh Visarjan Live Updates in Marathi : दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आहे. विसर्जनासाठी मुंबईतील पहिला गणपती म्हणजे गणेश गल्ली येथील बाप्पा च्या विसर्जन मिरवणुकीला पहिली सुरुवात होते. काही वेळेतच म्हणजेच सकाळी ८ वाजता मुंबईच्या राजाची आरती सुरू होईल आणि मग ८.१५ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्ली च्या बापाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यावर मुंबईतील इतर गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

Lalbaugcha Raja Visarjan LIVE Updates : लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार

Lalbaugcha Raja Visarjan LIVE Updates in Marathi : दहा दिवस लाडक्या गणरायाची पूजा केल्या नंतर आज लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे. सकाळी 9.30 वाजता विधिवत पूजा केली जाईल, त्यानंतर 11 वाजता राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे. राजेशाही मिरवणुकीची तयारी सध्या सुरू आहे.

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE :  सुवर्ण अलंकारांनी सजलेली दगडूशेठ गणरायाची मूर्ती

Pune Ganesh Visarjan Live Updates in Marathi : आज दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजता, गणरायाचे विसर्जन होणार आहे.

पारंपरिक वाद्य नगारा तसेच ढोल ताशा पथक या मिरवणुकीत सामील होणार आहे. पुणेकर भक्तभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देतील.

pune dagdusheth
pune dagdushethpune dagdusheth

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE : आरोग्य विभागासह महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

Pune Ganesh Visarjan Live Updates in Marathi : विसर्जन मिरवणुकीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे.

आरोग्य विभागातर्फे आज आणि उद्या डेक्कन जिमखाना, लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय येथे रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके तैनात असणार आहे.

या पथकात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिकांची नियुक्ती

बेलबाग चौक, टिळक चौक, स.प. महाविद्यालय, पुरम चौक, गोखले हॉल, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक तैनात असणार

Pune Ganesh Visarjan 2024 LIVE : ढोल-ताशा पथके, शंखनाद; गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज

Pune Ganesh Visarjan Live Updates in Marathi : पुणे शहरात मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात पार पडलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे कारण आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाचे विसर्जन होणार आहे. गणेश मंडळांनीही विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ तयार केले आहेत. ढोल-ताशा पथके, शंखनाद, बँड पथके सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी खास नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती चे विसर्जन सोहळा सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल...

Ganesh Visarjan 2024 LIVE : लाडका बाप्पा आज निरोप घेणार

Ganesh Visarjan Live Updates in Marathi : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' याच जयघोषात दहा दिवसांनी बाप्पााला निरोप दिला जाणार आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार आहेत. पुण्यातील मानाचे गणपती, मुंबईतील लालबागचा राजा यासारख्या गणपती मंडळाकडे राज्याचे लक्ष असेल. त्याचाच थोडक्यात आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com