Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट! ऐन उन्हाळ्यात पावसाने उडवली दाणादाण, शेती पिकांसह फळांचे नुकसान

Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रावर अवकाळी संकट आलं आहे. ऐन उन्हाळ्यात कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवली आहे. शेती पिकांसह फळांचे नुकसान झालं आहे.

Vishal Gangurde

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा मारा सुरु आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अववकाळी पावसाचा मोठा शेती पिकांना बसला आहे. अवकाळीने शेतकरी हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसामुळे काही भागात घरांचे पत्रे उडून गेले आहेत.

हिंगोलीत अवकाळीने केळी उत्पादक शेतकरी उध्वस्त

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव शिवारात अवकाळी वारे आणि पावसाने तासाभरात केळी उत्पादक शेतकऱ्याला उध्वस्त केले आहे. शेतकरी मारुती कराळे यांच्या शेतात मुलाप्रमाणे जोपासलेली केळीची बाग पूर्णपणे आडवी झाली आहे. पुढील आठ दिवसात कराळे यांची बाग तोडणीला येणार होती. मात्र त्याआधीच अवकाळीने होत्याचं नव्हतं केलं. लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या या बागेतून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न होईल, अशा अपेक्षा या शेतकऱ्याला लागली होती. मात्र अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने सगळं हिरावून घेतलं आहे.

घरांचे पत्रे उडाले

नांदेडच्या आंबेगाव परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील घरावरील वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

धाराशिवच्या उमरगामध्ये गारांचा पाऊस

धाराशिवच्या उमरगामध्ये गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान केले आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला आहे. गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले. मुरूम परिसरातील मूळज आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा बरसल्या.

अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी

अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली. अमरावतीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल झाली आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. भुईमुंग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकाच्या नुकसानीची शक्यता अधिक आहे.

शेती पिकांना गारपीटीचा तडाखा

पुण्याच्या चाकणसह आंबेगावसह शिरुर तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा बसला आहे. अचानक पडलेल्या गारपीटीच्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गहू कांदा डाळिंब यांसारख्या पिकांना फटका बसणार आहे. अवकाळीच्या संकटाने बळीराजाची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT