Dharashiv: प्रायव्हेट फोटो अन् ब्लॅकमेल, कळंब हत्या प्रकरणातील महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि..

Dharashiv woman case: धाराशिवच्या कळंबमधील महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून. परिसरात खळबळ.
Kalamb
KalambSaam
Published On

धाराशिवच्या कळंबमधील महिला हत्या प्रकरणात हळूहळू धक्कादायक माहिती समोर येत आहेत. सुरूवातीला या हत्येचा संबंध दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत जोडण्यात आला होता. मात्र, आता या महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हत्येबाबत आरोपींनी कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

आरोपी अटकेत

मनिषा बिडवे असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीचे नाव रामेश्वर भोसले आहे. तर, दुसऱ्या आरोपीचे नाव गुलाब सय्यद आहे. या हत्या प्रकरणात आरोपीने थरारक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Kalamb
Buldhana News: "माझी पत्नी आणून द्या"; बायको माहेरी गेली, नवऱ्याची सटकी, पठ्ठ्यानं एसटीच्या काचाच फोडल्या

मृतदेहासोबत मुक्कामी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबमधील महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबतच आरोपी २ दिवस मुक्कामी होते. आरोपीने मृतदेहाच्या शेजारी बसून जेवण केले. तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्याने आरोपी महिलेची गाडी घेऊन पसार झाला होता.

Kalamb
Pune News: जीममध्ये ओळख, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार अन् गर्भपात; माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप

आक्षेपार्ह फोटो अन् ब्लॅकमेल

रामेश्वर भोसले हा मृत महिलेकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आरोपीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मृत महिलेकडे होते. या फोटोंवरून महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती आहे. याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली. नंतर २२ मार्चला महिलेची हत्या केली.

मनीषा बिडवेचं बीड कनेक्शन

अनैतिक संबंधातून दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दाखवण्यासाठी मनीषा बिडवे या महिलेचा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मनीषा बिडवे या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com