Pune News: जीममध्ये ओळख, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार अन् गर्भपात; माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप

Ex-BJP Councilors Son Arrested: पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडित तरूणीने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Pune
Punesaam
Published On

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने केलेला प्रताप समोर आला आहे. तरूणाने आधी तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले. नंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करायला सांगितले. या प्रकरणात आता तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे बिंग फुटलं.

करण दिलीप नवले (वय वर्ष २८) असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे. करण आणि पीडित तरूणीची ओळख २०२२ साली व्यायामशाळेत झाली. दोघांमध्ये रोज संवाद आणि भेटीगाठी घडत होत्या. हळूहळू प्रेम फुलत गेलं. नंतर तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले.

Pune
Beed: "आम्ही सरपंचाला उद्या उचलतो..", संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी 'डर्टी प्लॅन', घुले अन् चाटेच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं?

या शारीरिक संबंधातून तरूणी ३ वेळा प्रेग्नेंट राहिली होती. नंतर पीडित महिलेला त्याने गोळ्या देऊन गर्भपात केला. महिला नंतर पुन्हा गरोदर राहिली. घरच्यांना याची माहिती पीडित तरूणीने देऊ नये म्हणून त्याने तरूणीशी लग्न केले. १६ फेब्रुवारी २०२५ला आळंदीत जाऊन दोघांनी लग्न केले होते.

Pune
Beed News: बीडमध्ये कराड- घुलेची दहशत, पण जेलमध्ये त्यांच्यावर हात टाकणारा अक्षय आठवले कोण?

पण तिला नांदायला सासरी नेले नाही. तिचा गर्भपात व्हावा, यासाठी आरोपी पीडित तरूणीला मारहाण करत राहिला. याच मारहाणीनंतर तरूणीने थेट पोलीस ठाणे गाठले. पीडित तरूणीने आरोपीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com