Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Vidhan Bhavan bomb threat news : मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. इमारत रिकामी करण्यात आली असून बॉम्ब स्कॉडकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
bomb threat email sent to Maharashtra Vidhan Bhavan
bomb threat email sent to Maharashtra Vidhan BhavanSaam TV Marathi
Published On

bomb threat email sent to Maharashtra Vidhan Bhavan : विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मेल करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनातील सर्वांना बाहेर काढण्यात आले असून गेटवर रोखण्यात आले आहे. बॉम्ब स्कॉडकडून परिसरात सर्च ऑपरेशन कऱण्यात येत आहेत. विधानभवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून पोलिसांकडूनही तपास कऱण्यात येत आहे. बॉम्बच्या अफवा विधानभवनात वाऱ्यासारखी पसरली असून सर्वांना गेटवर रोखण्यात आले आहे.

मुंबईतील विधान भवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मंत्री, नेते विधानभवनात दाखल झालेले आहेत. त्यातच आज सकाळी अचानक धमकीचा मेल मिळाला, ही बातमी वाऱ्यासारखी विधानभवनात पसरली अन् एकच गदारोळ उडाला. सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात बॉम्ब असल्याचा अधिकृत साईटवर धमकीचा मेल आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

bomb threat email sent to Maharashtra Vidhan Bhavan
SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ विधान भवनाकडे धाव घेतली. विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सर्वात आधी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सर्वांना गेटजवळ सुरक्षित ठिकाणी उभं कऱण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून इमारतीत तपासणी कऱण्यात आली. मुंबई पोलिसांचे विशेष पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) यांची सध्या विधानभवन परिसराची कसून तपासणी सुरु आहे.

bomb threat email sent to Maharashtra Vidhan Bhavan
US–Iran Conflict : मोठी बातमी! सर्व मोठे नेते मारले, इराण उद्ध्वस्त; डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्ध जिंकल्याचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com