Manasvi Choudhary
अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अचूक सवयी यांचा संपूर्ण परिणाम केसांवर होतो केस गळण्याची समस्या निर्माण होते.
अनेकजण केसांसाठी महागड्या पार्लरमध्ये जाऊन उपाय करतात मात्र याचा देखील परिणाम होत नाही अशावेळी तुम्ही स्वयंपाकघरातील सोपे उपाय करू शकता.
केसांच्या वाढीसाठी स्काल्प मसाज हे महत्वाचे आहे. डोक्याची मालिश केल्याने केसांच्या मुळांना फायदा होतो केसांची वाढ होेते.
स्काल्प मसाज केल्याने डोक्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते यामुळे केसांच्या मुळांना देखील पोषण मिळते.
स्काल्प मसाज केल्याने केसांची मुळे सक्रिय होतात यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. केसांची वाढ मुळापांसून होते.
उन्हाळ्याच्या दिवसात खोबरेल तेलाने किंवा कोरफडने केसांची मालिश करणे महत्वाचे आहे. तेल कोमट करून केसांना लावल्यास फायदा होईल .
येथे दिलेली माहित ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.