Manasvi Choudhary
ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याचे डिझाईन तुम्ही स्टायलिश निवडू शकता. आजकाल अनेक पॅटर्नमध्ये हे डिझाईन्स असतात.
पांरपारिक आणि मॉडर्न अश्या दोन्ही स्टाईलमध्ये तुम्ही हे डिझाईन्स निवडू शकता यामुळे तुमचा साडी लूक उठून दिसेल.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला व्ही आकारत कट घेऊन त्याला तुम्ही छान डिझाईन देऊ शकता. यामुळे तुमचा पाठीचा आकार मोठा दिसतो व ब्लाऊजची स्टाईल सुंदर दिसते.
महिलांची पंसती असलेला ब्लाऊज पॅटर्न म्हणजे मटका गळा. मटका आकारात या गळ्याला डिझाईन केलेले असते.
ब्लाऊजच्या पाठीमागचा गळा नेटचा तुम्ही शिवू शकता याला बाजूने खास नाजूक एम्ब्रॉयडरी किंवा मणी असतात. हे नेट साडीच्या रंगाचे तुम्ही लावू शकता.
ब्लाऊजच्या खोल गळ्याच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला कापडाचा मोठा 'बो' लावला जातो. हे इंडो-वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट आहे.
पानाच्या आकाराचा ब्लाऊजची मागची डिझाईन तुम्ही पारंपारिक लूकसाठी निवडू शकता. खास पूजा, सणासुदीला साडीवर तुम्ही ब्लाऊजची अशी स्टाईल करू शकता.