Maharashtra Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात धुवाधार पाऊस, मुबंई - गोवा महामार्गावर साचलं पाणी

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये दुपारपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली.

Priya More

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुबंई - गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनाचालकांना अडचणी येत आहेत. तर अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडली आहे.

सातारा -

साताऱ्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पाचगणी, वाई भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन ठिकाणी वीज कोसळली. यामध्ये ४० बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाने पसरणी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

सांगली -

सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. शहरासह अनेक भागांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. सकाळपासून सांगली शहरांमध्ये उकाडा वाढला होता आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग चांगला सुखावला आहे.

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पेठ वडगाव, कर्ली, पन्हाळा रोड, असुरले पोर्ले मार्गावर तुफान पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. दुपारपासून कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

पुणे -

पुणे जिल्ह्यातील आळंदी खेड परिसरात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी अंगावर वीज पडून शेतमजूराचा दुदैवी मृत्यू झालाय. ओंकार ठाकर असे शेतमजूराचे नाव आहे.

रत्नागिरी -

रत्नागिरीमध्ये मुबंई - गोवा महामार्गावर पहिल्याच रिमझिम पावसात पाणी साचलंय. या साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना आपली वाहनं घेऊन जावी लागत आहेत. मुबंई- गोवा महामार्गावर लोटे या ठिकाणी महामार्गावर पाणी साचले आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा मिळाला.

रायगड -

रायगडच्या दक्षिण भागात दुपारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून महाड, माणगाव शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानेही वर्तवला असून आज सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

नांदेड -

आज दुपारी नांदेड जिल्हा आणि परिसरात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे नांदेड न्यायालयाच्या गेट समोर झाड कोसळले.विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर हे झाड कोसळल्याने न्यायालय परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पार्किंगमध्ये लावलेल्या काही दुचाकींनवर देखील हे झाड कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT