Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

Congress–Hindutva Face-Off : पुण्यात काँग्रेस प्रवक्ते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर एकमेकाशी भिडलेत. मात्र राजकारणात विचारांची लढाई मुद्द्यांनी लढण्याऐवजी गुद्द्यांनी का लढण्यात आली ? काँग्रेसच्या हनुमंत पवारांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंवर कोणता आरोप केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Congress–Hindutva Face-Off
Tension flares in Pune as Congress spokesperson Hanumant Pawar and Hindutva activist Tushar Damgude clash on the street.saam tv
Published On
Summary
  • पुण्यात काँग्रेस व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर भिडंत.

  • टीव्हीवरील वैचारिक वादाचे रूपांतर हाणामारीत.

  • पिस्तूलचा धाक दाखवल्याचा गंभीर आरोप.

हा राडा गावगुंडांचा नाही तर टिव्हीवर डिबेट करणाऱ्या दोन प्रवक्त्यांमधील आहे...टिव्हीवरच्या वैचारिक भांडणाचं रुपांतर थेट रस्त्यावरच्या हाणामारीत झालयं. हिंदूत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण केली. मात्र हा राडा का झाला ऐका. हनुमंत पवारांच्या तोंडूनच.

Congress–Hindutva Face-Off
Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटली? राज्यसभेवरून घडी विस्कटली, मविआतील विसंवादाचं कारण आहे काय?

दुसरीकडे हनुमंत पवारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केलीय.पोलिसांनी तुषार दामगुडेचं पिस्तूल जप्त केलंय. दामगुडेचा परवाना ही ताब्यात घेण्यात आलाय. मात्र घडलेल्या घटनेच्या कुठलाच पश्चाताप न बाळगता हनुमंत पवारांना धडा शिकवल्याचं विधान हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंनी केलयं.

Congress–Hindutva Face-Off
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

दरम्यान पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हिंसेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. काँग्रेस भवनवरील दगडफेक आणि प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे पुण्याची राजकीय संस्कृती धोक्यात आली असा आरोप काँग्रेसनं केलाय.

तुषार दामगुडे हे हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून उजव्या विचारसरणीसह भाजपची बाजू माध्यमांवर हिरहिरीनं मांडताना अनेकदा दिसतात...त्यामुळे राऊतांनी भाजपवरच निशाणा साधलाय. तर हिंसेला पाठिंबा देत नसल्याचं सांगत भाजपनं कारवाईचं आश्वासन दिलंय. गेल्या काही वर्षांत राजकारणाच स्तर खालावल्याचं सातत्यानं बोललं जातयं. मात्र राजकारणात मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांनी लढवली जात असल्यानं महाराष्ट्राचा बिहार झालाय का? हा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com