Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटली? राज्यसभेवरून घडी विस्कटली, मविआतील विसंवादाचं कारण आहे काय?

Rajya Sabha Tension in Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत फूट पडलीय. राज्यसभेवरून मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांच्या बैठकीला दांडी मारून मविआतील विसंवाद उघड केलाय. त्यामुळे मविआ फूट कशी पडली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Rajya Sabha Tension in Maha Vikas Aghadi
Leaders of Thackeray Sena and Congress address media as NCP leaders remain absent during the MVA press conference ahead of the Budget Session.saam tv
Published On
Summary
  • राज्यसभेच्या मुद्द्यावरून मविआत अंतर्गत वाद.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदेला गैरहजर.

  • ठाकरेसेना आणि काँग्रेसचे नेते उपस्थित.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला ठाकरेसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच हजेरी लावली.शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला नाही. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अनुउपस्थितीबद्दल काय म्हटलं ऐका.

एकीकडे महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीला मारलेल्या दांडीमुळे मविआत संभ्रम निर्माण झालाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं मविआच्या बैठकीला दांडी का मारली? पाहूयात. विरोधकांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत दरवेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे किंवा जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित राहतात.

Rajya Sabha Tension in Maha Vikas Aghadi
Rohit Pawar: कंठ दाटला, शब्दही फुटेना; रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले|Video Viral

मात्र यावेळी विरोधकांच्या पत्रकार परिषदेवेळी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे साताऱ्यामध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त बाहेर होते. तर रोहित पवार दिल्लीत असल्यानं अनुउपस्थित राहिले. जितेंद्र आव्हाड यांना पत्रकार परिषदेला जाण्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी काय कारण दिलं ते पाहूयात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारण्यामागे कोणती राजकीय कारणं असू शकतात. पाहूयात.

Rajya Sabha Tension in Maha Vikas Aghadi
मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशी काँग्रेस एका गटात भीती

त्यामुळे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात काँग्रेसचा विरोध

ठाकरेसेना आणि काँग्रेस राज्यसभेसाठी आग्रही

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ठाकरेसेनेला विधानपरिषद देण्याचा प्रस्ताव

शरद पवारांच्या पक्षाला वगळून ठाकरेसेनेची काँग्रेस हायकमांडशी परस्पर चर्चा

यासर्व कारणांमुळे मविआतील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय.मात्र मविआत कुठलीही फूट नसल्याचा दावा मविआ नेत्यांनी केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जरी ठाकरेसेनेपुढे विधानपरिषदेचा प्रस्ताव ठेवला असला तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार यावर राज्यसभेचं पुढचं गणित ठरणार आहे. त्यामुळे हा वाद वाढणार की मिटणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com