सातारा, ता. ५ जून २०२४
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच डंका पाहायला मिळाला. अजित दादांच्या नवा पक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या शरद पवार यांनी १० पैकी ८ खासदार निवडून आणण्याची किमया केली. या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात झालेला शशिकांत शिंदे यांचा पराभव पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शशिकांत शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव केला. या पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली जात असतानाच तुतारी अन् पिपाणीच्या गोंधळाचाही या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा आहे.
काय आहे तुतारी अन् पिपाणीचा घोळ?
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक मतदार संघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिले होते. दोन्ही चिन्ह सारखी असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होईल, अशी भितीही शरद पवार गटाने व्यक्त केली होती.
मतदारांमध्ये संभ्रम?
पक्षाकडून निवडणूक आयोगाला चिन्ह बदलण्याची मागणीही केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. आता सातारा लोकसभेमध्ये झालेला शशिकांत शिंदे यांचा पराभव आणि अपक्ष उमेदवाराला पडलेली मते यावरुन ही भिती खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे.
सातारा लोकसभेत शशिकांत शिंदे यांचे तुतारी हे निवडणूक चिन्ह होते. तसेच अपक्ष उमेदवार संजय गाडे यांचे पिपाणी चिन्ह होते. अंतिम निकालात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 71 हजार 134 इतकी मते मिळाली. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार ५ लाख ३८ हजार ३६३ मते पडली. म्हणजे 32 हजार 771 मतांनी शिंदेंचा पराभव झाला. विशेष म्हणजे पिपाणीवर लढलेले अपक्ष उमेदवाराला तब्बल ३७ हजार ६२ मते मिळाली. त्यामुळे पिपाणीचा फटका बसला का? अशी चर्चा आता साताऱ्यामध्ये सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.