Dhananjay Munde News: 'पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...' पंकजा ताईंच्या पराभवानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

Beed Loksabha Constituency News: बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde News: 'पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...' पंकजा ताईंच्या पराभवानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!
Pankaja Munde Dhananjay MundeSaamtv

रुपाली बडवे, ता. ५ जून २०२४

बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडेंचा दारुण पराभव भारतीय जनता पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. क्रिकेटमध्ये होणाऱ्या सुपरओव्हर प्रमाणेच शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मतमोजणीच्या खेळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

"राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

तर "पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजारपेक्षा अधिक मतदानरुपी आशीर्वाद दिलेल्या माय बाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवर नेत्यांचे तसेच सर्व जिवलग सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते. उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!" असा नाराही त्यांनी दिला आहे.

Dhananjay Munde News: 'पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...' पंकजा ताईंच्या पराभवानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!
Maharashtra Politics : मोदींचा ४०० पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे

दरम्यान, बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग बाप्पा सोनवणे यांचे आव्हान होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बाजी मारली. मतदार संघात, आमदार खासदारांची फौज असताना पंकजा मुंडेंना पराभवाचा झटका बसला.

Dhananjay Munde News: 'पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...' पंकजा ताईंच्या पराभवानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!
Maharashtra Politics: 'देशात इंडिया आघाडीचेच सरकार; फॉर्म्युलाही तयार', काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सर्वात मोठा दावा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com