Maharashtra Politics : मोदींचा ४०० पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे

Shiv Sena vs BJP Maharashtra Politics : नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला", अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.
मोदींचा ४०० पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे
Saamana Editorial on Narendra ModiSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसला. मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही त्यांना केवळ २४१ जागांवरच विजय मिळवता आला. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीला निवडणुकीत मोठं यश मिळालं. त्यांचे जवळपास २३४ उमेदवार विजयी झाले. दरम्यान, या अभूतपूर्व निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

मोदींचा ४०० पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे
Bajrang Sonawane Accident : मोठी बातमी! बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात; जखमींवर उपचार सुरू

"स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला", अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले", असा टोलाही सामनातून लगावण्यात आला.

"मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला", असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं.

"दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग’ मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर नरेंद्र मोदी करणार आहेत काय?", असा सवालही सामनातून विचारण्यात आला.

"पक्ष गेला, चिन्ह गेले, आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने दोन आकड्यांत जागा जिंकल्या. महाविकास आघाडी म्हणून 30 जागा जिंकणे हा धनशक्ती व सरकारी यंत्रणेचा पराभव आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत", असा टोलाही सामनातून भाजपला लगावण्यात आला.

"देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे", असा घणाघात सामनातून लगावण्यात आला. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल", असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.

मोदींचा ४०० पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे
Maharashtra Politics : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश, महायुतीला भगदाड; विजयी उमेदवारांची फायनल यादी पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com