Bajrang Sonawane Accident : मोठी बातमी! बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात; जखमींवर उपचार सुरू

Beed Bajrang Sonwane Car Accident News : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात झाला आहे.
Beed Bajrang Sonwane Car Accident News
Beed Bajrang Sonwane Car Accident NewsSaam TV

बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला मंगळवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला पाठीमागून धडकली. या अपघातात काहीजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धुळे-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली.

Beed Bajrang Sonwane Car Accident News
Maharashtra Politics : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश, महायुतीला भगदाड; विजयी उमेदवारांची फायनल यादी पाहा

सुदैवाने या अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरुप असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

या पराभवानंतर बजरंग सोनवणे मंगळवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी होते. तेथून परतत असताना ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला येऊन धडकली.

सुदैवाने या घटनेत बजरंग सोनवने यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी तुमच्या आशीर्वादाने सुखरुप असून कोणतेही चिंता करण्याचं कारण नाही, असं सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

बीडमधील अटीतटीची लढतील बजरंग सोनवणे विजयी

बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बीडकरांचा श्वास रोखून धरणाऱ्या मतमोजणीत अखेर बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. पंकजा मुंडे यांना ३२ व्या फेरीत तब्बल साडेसहा हजार मताधिक्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Beed Bajrang Sonwane Car Accident News
Rahul Gandhi News : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार? नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com