Husband-Wife Phone Clash
viral news in marathiSaam tv

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

viral news in marathi : आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यात दावा केलाय की पतीचा फोन हिसकावल्यास पत्नीला जेल होऊ शकते...पण, खरंच असा कायदा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Published on

आता पत्नीने तुमचा मोबाईल हिसकावला, मेसेज पाहिले, मोबाईलमधून डाटा घेतला आणि याची जर तक्रार केल्यास जेल होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? मोबाईलवरून अनेक पती-पत्नींमध्ये वाद होतात...काहीजण एकमेकांचे मोबाईल तपासतात...चॅटिंग पाहतात, कुणाला फोन केलंय हेदेखील पाहिलं जातं...यावरून जोरदार वादही होतात...मात्र, याची तक्रार केल्यास कारवाई होते असा दावा करण्यात आलाय...

हा दावा केल्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...कारण, अनेकांचे मोबाईलवरून वाद होत असल्याने खरंच याची तक्रार केल्यास कारवाई होते का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञांची भेट घेतली...आणि व्हिडिओत जो दावा केलाय तो खरा आहे का हे जाणून घेतलं...

Husband-Wife Phone Clash
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

तर आमच्या टीमने अजून एका तज्ज्ञांकडून माहिती घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन

संविधानानुसार राईट टू प्रायव्हसीचा भंग होतो

क्रिमिनल अफेन्स,मानसिक छळासाठी कारणीभूत ठरू शकतो

भारतीय न्याय संहिता 304 अंतर्गत 3 वर्षांची जेल,दंड लागतो

कुठलीही वस्तू पती-पत्नीने विनापरवानगी हिसकावल्यास गुन्हा ठरतो

मोबाईल हिसकावून घेणं नव्हे तर पार्श्वभूमी हिंसक असल्यास कारवाई

Husband-Wife Phone Clash
कल्याण डोंबिवली महापालिकेचा कारभार वादात, कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कर्मचारी गंभीर भाजला

तक्रार केल्यास कारवाई होते हे खरं आहे...पण, त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे तपासलं जातं...तरच गुन्हा दाखल करून अटक केली जाते...क्षुल्लक कारणावरून कारवाई केली जात नाही...आमच्या पडताळणीत वारंवार पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा फोन तपासून छळ केल्यास जेलची शिक्षा होऊ शकते हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com